जगभरात प्रवास करण्यायोग्य ११८ देशांच्या सूचीमध्ये भारताचा दहावा क्रमांक !

भारताच्या खाली फ्रान्स, जर्मनी, जपान, तुर्कस्तान आणि स्पेन यांसारख्या देशांचा क्रमांक लागला आहे. हे सर्व देश पर्यटनासाठी लोकप्रिय मानले जातात; मात्र त्यांना मागे टाकत भारताने या सूचीमध्ये सरस कामगिरी केली आहे.

अविनाश पाटील यांनी दाभोलकर कुटुंबियांवरील केलेले आरोप धादांत खोटे ! – अंनिस

अंनिसचे अविनाश पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच डॉ. हमीद आणि मुक्ता दाभोलकर यांनी अंनिसचा ट्रस्ट कह्यात घेऊन ७ कोटी रुपये हडपल्याचा आरोप प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला होता.

WHO संकेतस्थळावरील मानचित्रामध्ये जम्मू-काश्मीर पाकचा, तर अरुणाचल प्रदेश चीनचा भाग दाखवला !

तृणमूल काँग्रेसचे खासदार शंतनू सेन यांची पतंप्रधान मोदी यांच्याकडे तक्रार

सर्वोच्च न्यायालयाचा ‘व्हाय आय किल्ड गांधी’ (मी गांधी यांना का मारले) चित्रपटाविरोधातील याचिकेवर सुनावणीस नकार

न्यायालयाने म्हटले आहे की, कलम ३२ अंतर्गत याचिका तेव्हाच प्रविष्ट केली जाऊ शकते, जेव्हा मूलभूत अधिकाराच्या उल्लंघनाचा प्रश्न असेल.

पाकमधील मौलाना खादिम रिझवी याच्या भाषणाने प्रभावित होऊन हिंदु तरुणाची हत्या केल्याची धर्मांधांची स्वीकृती !

गुजरातमधील किशन बोलिया या हिंदु तरुणाच्या हत्येचे प्रकरण
खादिम रिझवी हा पाकिस्तानातील जिहादी संघटना ‘तहरीक-ए-लब्बैक पाकिस्तान’चा संस्थापक

स्वतःची भूमिका स्पष्ट न केल्याने सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला साडेसात सहस्र रुपयांचा दंड !

९ राज्यांमध्ये हिंदूंना अल्पसंख्यांक दर्जा देण्याचे प्रकरण

कर्नाटकातील प्रत्येक गावात ‘गोशाळा’ प्रारंभ करा ! – कर्नाटक उच्च न्यायालयाची राज्य सरकारला सूचना

मुळात उच्च न्यायालयाला असे सांगावे लागू नये ! सरकारनेच त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे ! कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार असतांना अशी स्थिती असू नये, असेच हिंदूंना वाटते !

भोपाळ (मध्यप्रदेश) येथे गोशाळेच्या जवळ सापडले १०० हून अधिक गायींचे मृतदेह

गोशाळेकडून गायींविषयी अशा प्रकारचा हलगर्जीपणा होत असेल, तर अशांच्या संचालकांवर गुन्हा नोंदवून त्यांना कारागृहात डांबले पाहिजे ! तसेच असे मध्यप्रदेशातील अन्य गोशाळांमध्ये होत नाही ना ? याची पहाणी केली पाहिजे !

कोझीकोड (केरळ) येथे महंमद पैगंबर यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केल्यावरून पाद्य्राच्या विरोधात गुन्हा नोंद

माणिककडवू येथील सेंट थॉमस चर्चमध्ये एका कार्यक्रमाच्या वेळी केलेल्या भाषणात पाद्री अँथोनी यांनी हलाल खाद्यपदार्थ आणि महंमद पैगंबर यांच्याविषयी अवमान करणारे विधान केल्याचा आरोप आहे.

भारतातील बांगलादेशाच्या राजनैतिक अधिकार्‍याला बांगलादेशाने माघारी बोलावले !

बांगलादेशाच्या उच्चायुक्तालयातील अधिकारी महंमद सानियुल कादर याला महिलांना अश्‍लील संदेश आणि व्हिडिओ पाठवल्याच्या प्रकरणी बांगलादेशाच्या परराष्ट्र मंत्रालयाने बांगलादेशमध्ये बोलावून घेतले आहे.