पंतप्रधान मोदी यांच्या पंजाबमधील सुरक्षेच्या प्रकरणातील सर्व नोंदी सील करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाबमधील दौर्‍याच्या वेळी सुरक्षेमध्ये झालेल्या अक्षम्य चुकीविषयी सर्वोच्च न्यायालयाने प्रवासाची नोंद आणि अन्वेषण यंत्रणांना सापडलेल्या पुराव्यांना सुरक्षित ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

रशियामध्ये लहान मुलांवर बलात्कार करणार्‍यांना उत्तर ध्रुवावरील आर्क्टिक येथील कारागृहात ठेवणार !

या कायद्याला पुढील मासामध्ये संसदेमध्ये संमती मिळण्याची शक्यता आहे. आर्क्टिक येथे गोठवणारी थंडी असून तेथे उणे तापमान असते.

हिंदूंची भूमी बळकावू पहाणार्‍या समाजवादी पक्षाचे माजी खासदार अदीब याच्यावर गुन्हा नोंद !

धर्मांध राजकारण्यांचा ‘भूमी जिहाद’ जाणा ! अशा धर्मांध नेत्याला तात्काळ अटक करून त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी राज्यातील भाजप सरकारने प्रयत्न करावा, असेच हिंदूंना वाटते !

कझाकिस्तानात तेल दरवाढीनंतर झालेल्या हिंसाचारामुळे सरकारचे त्यागपत्र

केंद्र सरकारने तेलाचे दर वाढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर देशात झालेल्या हिंसाराचानंतर सरकारने त्यागपत्र दिले. सरकारने पेट्रोलियम पदार्थ, घरगुती गॅस आणि गॅसोलिन यांच्या दरात वाढ केली होती.

उत्तराखंडचे काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांच्या सभेत चाकू घेऊन आलेल्या तरुणाला पकडले !

या वेळी मंचावर उपस्थित असणार्‍या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रसंगावधान दाखवत या तरुणाला पकडून त्याच्याकडून चाकू खेचून घेतल्यामुळे मोठी घटना टळली.

८ राज्यांतील अल्पसंख्यांक हिंदूंना ‘अल्पसंख्यांक’ दर्जा मिळण्यासाठी केंद्राला उत्तर देण्यासाठी ४ आठवड्यांची मुदत !

जनहित याचिकेवर सुनावणी करतांना सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

महिलेच्या केसांत थुंकल्याच्या प्रकरणी केशरचनाकार जावेद हबीब यांची क्षमायाचना !

राष्ट्रीय महिला आयोगानेही या प्रकरणात हस्तक्षेप केला असून त्यांनी उत्तरप्रदेश पोलिसांना त्या व्हिडिओची सत्यता तपासण्यास सांगितले आहे.

शासकीय कामकाजातील भ्रष्टाचाराचा भांडाफोड करणार्‍या ‘कॅग’च्या आक्षेपांकडे सरकारचे दुर्लक्ष !

शासकीय कामकाजात अब्जावधी रुपयांच्या निधीचा दुरुपयोग झाल्याचे समोर येऊनही त्यावर सर्वपक्षीय शासनकर्त्यांकडून कोणतीच उपाययोजना न काढली न जाणे, हे देशासाठी लज्जास्पद !

कनिष्ठ न्यायालय देवतेच्या मूर्तीची सत्यता पडताळण्यासाठी तिला न्यायालयात सादर करण्यास कसे सांगू शकते ? – मद्रास उच्च न्यायालय

मद्रास उच्च न्यायालयाने या प्रकरणाचे अभ्यासाअंती जे मत मांडले, ते कौतुकास्पद आहे. अशा न्यायाधिशांमुळेच सामान्य जनतेचा न्यायालयावरील विश्‍वास टिकून आहे !