केंद्रीय माहिती आयुक्त श्री. उदय माहूरकर आणि सहलेखक श्री. चिरायू पंडित लिखित ‘वीर सावरकर – दी मॅन हु कुड हॅव प्रिव्हेंटेड पार्टिशन’ पुस्तकाचे गोव्यात लोकार्पण

‘वीर सावरकर – दी मॅन हु कुड हॅव प्रिव्हेंटेड पार्टिशन’ या पुस्तकाचे प्रकाशन ९ जानेवारी या दिवशी येथील ‘गोमंतक मराठा समाज  राजाराम स्मृति सभागृहा’त आयोजित विशेष कार्यक्रमात करण्यात आले.

भारतीय सागरी सीमेत घुसलेल्या पाकच्या नौकेला तटरक्षक दलाने कह्यात घेतले !

भारतीय तटरक्षक दलाने गुजरात येथील अरबी समुद्रात भारतीय सागरी सीमेमध्ये घुसलेल्या ‘यासीन’ नावाच्या नौकेला कह्यात घेतले.

मदर तेरेसा यांच्या संस्थेच्या परदेशी देणगी नियमन कायद्यानुसारच्या नोंदणीचे केंद्र सरकारकडून नूतनीकरण

ही नोंदणी रहित झाल्यामुळे ओडिशा सरकारने मदर तेरेसा यांच्या संस्थेला मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून ७८ लाख रुपये दिले होते. आता हे पैसे सरकार परत घेणार का ?

श्री क्षेत्र द्वारापूर, धारवाड (कर्नाटक) येथील संत श्री परमात्माजी महाराज यांची वाराणसी येथील सनातन संस्थेच्या सेवाकेंद्राला सदिच्छा भेट !

सेवाकेंद्रातील युवा साधकांना पाहून ते म्हणाले, ‘‘या सर्वांचे परमभाग्य आहे. त्यांचे जीवन यासाठीच आहे; म्हणून ते एवढ्या लहान वयात सेवाकेंद्रात राहून साधना करत आहेत.’’

देशात गेल्या २४ घंट्यांत १ लाख ५९ सहस्र नागरिक कोरोनाबाधित !

जनतेकडून कोरोनाच्या संदर्भातील प्रतिबंधात्मक नियमांचे पालन केले जात नसल्यानेच ही रुग्णवाढ होत आहे, हे लक्षात घेऊन जनतेने नियमांचे पालन केले पाहिजे ! बेशिस्त जनता कोरोनाला आमंत्रित करत आहे, हे भारतियांना लज्जास्पद !

(म्हणे) ‘दलित आणि मुसलमान एकत्र आले, तर ते संपूर्ण भारतात राज्य करू शकतात !’ – गुफरान नूर, जिल्हाध्यक्ष, अलीगड, एम्.आय.एम्.

उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा प्रकारची विधाने करणार्‍यांवर तात्काळ कारवाई करून त्यांना कारागृहात डांबले पाहिजे !

ठार झालेल्या जिहादी आतंकवाद्याचे समर्थन करणार्‍या काश्मीरमधील पत्रकाराला अटक

आतंकवाद्यांचे समर्थन करणार्‍यांना आतंकवादी ठरवून त्यांना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे !

इयत्ता दुसरीतील हिंदु विद्यार्थिनीने गणिताचा प्रश्‍न न सोडवल्याने शिक्षा म्हणून तिला अल्लाची प्रार्थना करण्यास सांगितले !

याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा ! कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार असल्याने याप्रकरणी हिंदु विद्यार्थिनीला न्याय मिळावा आणि शाळेवर कारवाई व्हावी, असेच हिंदूंना वाटते !

आत्मकूर (आंध्रप्रदेश) शहरामध्ये अवैध मशिदीला विरोध करणार्‍या भाजपच्या कार्यकर्त्यांवर धर्मांधांकडून पोलीस ठाण्यातच आक्रमण !

आंध्रप्रदेशमध्ये वाय.एस्.आर्. पक्षाचे राज्य आहे कि धर्मांधांचे ? पोलीस ठाण्यामध्येच जर लोकांवर धर्मांध आक्रमण करत असतील, तर सर्वसामान्य लोकांचे रक्षण कोण करणार ? असे पोलीसदल काय कामाचे ?

गोव्यातील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम

केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या निर्बंधांचे गोव्यात काटेकोरपणे पालन केले जाणार आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई केली जाणार आहे.