पुणे येथे विविध ३५ ठिकाणी निवेदनांच्या माध्यमांतून राष्ट्रध्वजाच्या संहितेविषयी प्रबोधन

फलक प्रसिद्धीद्वारे पुणे येथे ३७, तर पिंपरी-चिंचवड येथे २४ फलकांच्या माध्यमांतून राष्ट्रध्वजाच्या संहितेविषयी प्रबोधन करण्यात आले.

एअर इंडियाचे अधिकृत नियंत्रण टाटा आस्थापनाकडे !

या आस्थापनामुळे आता टाटा देशातील दुसरी सर्वांत मोठे विमान आस्थापन बनले आहे. ६९ वर्षांनंतर एअर इंडियाची मालकी पुन्हा टाटाकडे आली आहे.

बलुचिस्तानमधील आक्रमणात पाकचे १० सैनिक ठार

बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्‍यांकडून हे आक्रमण करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. 

अमेरिकेने युक्रेनला पाठवलेल्या प्रत्येक क्षेपणास्त्रावर रशियाचे राष्ट्रपती पुतिन यांचे नाव !  

युद्धाच्या विचारांतून मागे हटण्यासाठी रशियावर दबाव निर्माण करण्याचा हा अमेरिकेचा एक प्रयत्न असल्याचे सांगण्यात येत आहे.

कथित आक्षेपार्ह विधानावरून ‘सुदर्शन टीव्ही’चे संपादक सुरेश चव्हाणके यांच्या विरोधातील याचिका

सुरेश चव्हाणके यांनी एका कार्यक्रमात भारताला हिंदु राष्ट्र बनवण्यासाठी एका समुहाला ठार मारण्याची शपथ दिली. तसेच त्यांनी ट्वीट करत ‘एकच स्वप्न : हिंदु राष्ट्र’ म्हटले होते. ‘असे म्हणणे राज्यघटनेच्या विरोधात आहे’, असा दावा या याचिकेत करण्यात आला आहे.

६ वर्षीय मुलीवर बलात्कार करणार्‍या धर्मांधाला फाशीची शिक्षा

बलात्काराच्या प्रत्येक घटनेत अशा प्रकारे कठोर शिक्षा केली, तरच अशा घटना काही प्रमाणात तरी अल्प होतील !

पू. भय्यूजी महाराज यांच्या आत्महत्येच्या प्रकरणी सेवक, वाहनचालक आणि काळजीवाहू सेविका यांना ६ वर्षांचा कारावास !

वर्ष २०१८ मध्ये पू. भय्यू महाराज यांनी स्वतःच्या परवानाधारक रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडत आत्महत्या केली होती.

मध्यप्रदेशातील जिल्हा न्यायालयातील महिला न्यायाधिशांची वरिष्ठांकडून लैंगिक छळ झाल्याविषयी सर्वोच्च न्यायालयात याचिका !

महिला न्यायाधिशांच्या आरोपात तथ्य असेल आणि न्यायाधीश जर वासनांध असतील, तर हे प्रकरण पुष्कळ गंभीर आहे. ‘असे न्यायाधीश पीडित महिलांचे खटले कशा प्रकारे हाताळत असतील’, असा विचार सामान्य जनतेच्या मनात आल्यास चूक ते काय ?

अमेरिकेला ख्रिस्ती राष्ट्र करण्यासाठी माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रयत्न !

‘पुरोगामी’ म्हणून ओळल्या जाणार्‍या अमेरिकेतही बहुसंख्य असणार्‍या ख्रिस्त्यांना त्यांचा देश ‘ख्रिस्ती राष्ट्र’ असावा’, असे वाटत असेल, तर बहुसंख्य हिंदूंना त्यांचा भारत ‘हिंदु राष्ट्र’ व्हावा, असे वाटल्यास चुकीचे ते काय ?

सरकारी नोकर्‍यांमध्ये अनुसूचित जाती-जमातींविषयी पदोन्नतीचे आरक्षण कसे असावे, हे राज्यांनीच ठरवावे ! – सर्वोच्च न्यायालय

घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आरक्षण केवळ १० वर्षे चालू ठेवावे’, अशी सूचना केली होती; मात्र ही आरक्षण संस्कृती अजूनही चालू आहे. याचा सर्वच स्तरांतील घटकांनी विचार करण्याची वेळ आता आली आहे !