मत्तीवडे (कर्नाटक) येथील महादेव मंदिरात कळसारोहण !

कळसारोहण सोहळ्याच्या निमित्ताने मत्तीवडे येथे २ दिवस सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते, तसेच धर्मशिक्षण विषयक माहिती देणार्‍या फलकांचे प्रदर्शनही लावण्यात आले होते.

बांगलादेश : ३ हिंदु मंदिरांच्या दारांवर अज्ञातांनी गोमांसाच्या पिशव्या टांगल्या

इस्लामी देशातील अल्पसंख्यांक हिंदूंची स्थिती जाणा ! भारतात कधी बहुसंख्यांकांकडून अशा प्रकारच्या धार्मिक भावना दुखावण्याच्या घटना घडतात का ? तरीही हिंदूंना ‘तालिबानी’ म्हणण्याचा प्रयत्न होतो आणि दुसरीकडे अफगाणिस्तानातील तालिबान्यांचे समर्थनही केले जाते !

धर्मनिरपेक्ष भारतात धर्मावर आधारित चालणारी ‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था तात्काळ बंद करा ! – राधानगरी येथे ‘मानव सुरक्षा सेवा संस्थे’चे निवेदन

या वेळी ‘मानव सुरक्षा सेवा संस्थे’चे संस्थापक अध्यक्ष श्री. बाजीराव मारुति मोरे आणि पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री. प्रवीण पाटील उपस्थित होते.

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमुळेच कोल्हापूर जिल्हा बँकेची निवडणूक ! – राजेश क्षीरसागर, अध्यक्ष, राज्य नियोजन मंडळ

कोल्हापूर जिल्ह्यातील स्वाभिमानी मतदार या लढ्यात शिवसेनेसमवेत राहील आणि जिल्हा बँकेतील मक्तेदारी मोडून निघेल, असा विश्वास राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केला आहे.

कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्‍वभूमीवर नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचा केंद्र सरकारचा राज्य सरकारांना सल्ला

वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्‍वभूमीवर कोरोनाच्या प्रसाराचा शोध घेण्यासाठी केंद्र सरकारने १ जानेवारी या दिवशी राज्यांसाठी एक मार्गदर्शिका जारी केली.

सरकारी निवृत्ती वेतनधारकांना जीवन प्रमाणपत्र सादर करण्याच्या मुदतीत २८ फेब्रुवारीपर्यंत वाढ

निवृत्तीवेतन आणि निवृत्ती वेतनधारक कल्याण विभागाकडून याची माहिती देण्यात आली आहे. वाढीव कालावधीत निवृत्तीवेतन बँक खात्यात जमा होणार आहे.

देशातील ६ सहस्र अशासकीय संस्थांचा परदेशी देणगी परवाना रहित

इंडियन मेडिकल असोसिएशन, जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ, नेहरू स्मृती संग्रहालय आदींचा समावेश

‘जय श्रीराम’च्या घोषणा देणार्‍या मुसलमान तरुणावर धर्मांधांकडून सामाजिक बहिष्कार !

सर्वधर्मसमभाव, धर्मनिरपेक्षता केवळ हिंदूंनी ठेवायची आणि ती ठेवण्यासाठी एकजात निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी हिंदूंना उपदेशाचे डोस पाजत रहाणार; मात्र धर्मांधांकडून करण्यात येणार्‍या अशा कट्टरतावादी कारवायांवर सर्वच जण मूळ गिळून गप्प बसणार !

महिलांवर अत्याचार करणे हा भगवंताचा अवमान ! – पोप फ्रान्सिस

आमीष दाखवून गरीब आणि आदिवासी यांचे धर्मांतर करणे, त्यांची नंतर फसवणूक करणे, कॉन्व्हेंट शाळेमध्ये हिंदु विद्यार्थ्यांना त्यांच्या धर्मानुसार आचरण करण्यास रोखणे, हाही भगवंताचाच अवमान आहे, असे पोप फ्रान्सिस कधी बोलणार अन् ख्रिस्ती मिशनर्‍यांना असे करण्यापासून कधी रोखणार ?

वाईट हवामानामुळेच बिपीन रावत यांचे हेलिकॉप्टर कोसळल्याचा निष्कर्ष

देशाचे पहिले तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख जनरल बिपीन रावत यांचे हेलिकॉप्टर नेमके कसे कोसळले, याविषयीची चौकशी पूर्ण झाली आहे.