जितेंद्र त्यागी (पूर्वाश्रमीचे वसीम रिझवी) यांच्या पत्नीला धर्मांधांकडून घरात घुसून मारहाण

उत्तरप्रदेशात भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडू नयेत, असेच हिंदूंना वाटते ! आता सरकारने अशा धर्मांधांवर कठोर कारवाई करून त्यांना साहाय्य करणार्‍या पोलीस अधिकार्‍याला नोकरीवरून काढून कारागृहात डांबले पाहिजे !

देहली येथे हिंदु व्यक्तीच्या बहिणीवर बलात्कार करणार्‍या धर्मांधाने कारागृहातून सुटल्यावर केली सदर हिंदु व्यक्तीची हत्या !

देहली भारतात आहे कि पाकिस्तानात ? देहलीमधील पोलीस केंद्र सरकारच्या नियंत्रणात असतांना तेथे पोलिसांचा वचक नाही, हेच यातून स्पष्ट होते !

केंद्रशासित दादरा नगर हवेली आणि दमण दीव येथेही करण्यात आला गोहत्या बंदी कायदा !

देशातील अनेक राज्यांनी आतापर्यंत अशा प्रकारचा कायदा बनवला आहे; मात्र त्याची कठोरपणे आणि प्रामाणिकपणे कार्यवाही केली जात नसल्याने गोहत्या थांबलेल्या नाहीत, ही वस्तूस्थिती आहे. याकडे शासनकर्त्यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे !

इंडिया गेटवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा उभारणार ! – पंतप्रधान

मोदी यांनी म्हटले आहे की, २३ जानेवारी या दिवशी नेताजी बोस यांची १२५ वी जयंती आहे. हा पुतळा त्यांच्याविषयी भारत ऋणी असल्याचे प्रतीक असणार आहे.

इराणी महिला पत्रकाराने हिजाब काढून टाकत असल्याचा व्हिडिओ प्रसारित करून महिलांना तसे अनुकरण करण्याचे आवाहन !

भारतातील तथाकथित महिलावादी नेत्या, संघटना, महिला आयोग आदी या इराणच्या महिला पत्रकाराला पाठिंबा देतील का ?

माजी पोप बेनेडिक्ट यांनी पाद्य्रांच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणी कठोर कारवाई केली नाही ! – जर्मनातील विधी आस्थापनाचा आरोप

विशेष नियमामुळे पाद्य्रांविरुद्ध गुन्हा नोंदवला जात नसल्याने त्यांचे फावते आहे. हा विशेष नियम हटवण्यासाठी आता व्हॅटिकनवर लोकांनी दबाव निर्माण करून पाद्य्रांना कारागृहात डांबण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे !

‘इंडिया गेट’वरील ‘अमर जवान ज्योती’ राष्ट्रीय युद्ध स्मारकातील ज्योतीमध्ये विलीन !

अमर जवान ज्योती स्मारक वर्ष १९७१ च्या पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात हुतात्मा झालेल्या ३ सहस्र ८४३ भारतीय सैनिकांच्या स्मरणार्थ बांधण्यात आले होते.

सुराना (मध्यप्रदेश) येथील धर्मांधांवर कारवाई झाल्यानंतर हिंदूंकडून पलायन करण्याची चेतावणी मागे !

मध्यप्रदेशातील भाजप सरकारने हिंदूंवरील अत्याचारांची तात्काळ नोंद घेत कारवाई करून त्यांना आश्‍वास्त केल्यासाठी अभिनंदन.

मिशो आस्थापनाकडून तिरंग्याच्या मास्कची विक्री !

मिशो’ या ऑनलाईन वस्तू विक्री करणार्‍या आस्थापनाने त्यांच्या संकेतस्थळावर भारतीय राष्ट्राध्वजाच्या रंगांसारखा मास्क विक्रीसाठी ठेवला होता. याची माहिती राष्ट्रप्रेमींना मिळाल्यावर त्यांनी हिंदु जनजागृती समितीला याविषयी कळवले होते.

जकार्ता समुद्रात बुडण्याच्या शक्यतेने इंडोनेशिया नुसंताराला बनवणार राजधानी !

इंडोनेशियाची राजधानी जकार्ता  पुढील काही वर्षांत समुद्रात पूर्णतः बुडण्याची शक्यता असल्याने इंडोनेशियाने राजधानी पालटण्याचा निर्णय घेत नुसंतारा हे शहर यापुढे राजधानी करण्याचा निर्णय घेतला आहे.