‘म. गांधी यांनी देशाचे तुकडे केल्याने ते ‘महात्मा’ नाहीत आणि ‘राष्ट्रपिता’ही होऊ शकत नाहीत’, असे म्हणणारे तरुण मुरारी बापू यांच्यावर गुन्हा नोंद !

  • स्वातंत्र्यवीर सावरकर यांना काँग्रेसवाल्यांकडून सातत्याने ‘माफीवीर’ म्हटले जात असतांना, तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर गांधी हत्येच्या आरोपातून निर्दोष मुक्त झाले असतांनाही त्यांना गांधींच्या हत्येसाठी उत्तरदायी ठरवणार्‍यांवरही अशा प्रकारचे गुन्हे का नोंदवले जात नाहीत ? – संपादक
  • मध्यप्रदेशातील काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांच्याकडून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान होतांना त्याच्यावर अशा प्रकारचे गुन्हे राज्यातील भाजप सरकारने नोंदवायला हवेत, असेच हिंदूंना वाटते ! – संपादक

नरसिंगपूर (मध्यप्रदेश) – म. गांधी ‘महात्मा’ नाहीत आणि राष्ट्रपिताही होऊ शकत नाहीत. ते जिवंत असतांनाच त्यांनी देशाचे तुकडे केले; म्हणूनच त्यांना देशद्रोही म्हटले पाहिजे, असे विधान तरुण मुरारी बापू नावाच्या भागवत कथावाचक यांनी केल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तरुण मुरारी बापू अजूनही त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. तरुण मुरारी बापू यांनी छिंदवाडा रोडवरील वीरा लॉन येथे श्रीमद् भागवत कथेच्या वेळी वरील विधान केले होते. यापूर्वी धर्मसंसदेमध्ये गांधी यांच्या विरोधात कथित अपशब्द वापरल्यावरून कालीचरण महाराज यांना अटक करण्यात आली आहे.