देशाची राजकीय महत्त्वाकांक्षा साध्य करण्यासाठी शत्रूदेशातील समाजाला लक्ष्य करणे हा शाश्वत पर्याय ! – अजित डोवाल, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार

भविष्यातील युद्धनीती नागरिक केंद्रित असणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन ! असे बचावात्मक भूमिकेत राहण्यापेक्षा आक्रमणाचा पर्याय भारत कधी निवडणार ?

(म्हणे) ‘आमच्या जीवनात धार्मिक स्थळे आणि तीर्थस्थाने यांना मोठे महत्त्व असून परमेश्‍वराच्या आशीवार्दाने आणि दर्शनाने आम्हाला नवीन ऊर्जा मिळते !’

हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात होतात त्या वेळी गप्प बसणार्‍या केजरीवाल यांच्यासारख्या नेत्यांना निवडणूक आली की, परमेश्‍वर का आठवतो ?

सरकारने चिनी बनावटीच्या फटाक्यांवर बंदी कायम ठेवावी !

यंदाही चिनी फटाक्यांवरील बंदी कायम रहावी, यासाठी भारत सरकारने जागृती करावी. अवैध मार्गांनी चिनी फटाके भारतात आणले जाऊन त्यांची विक्री होऊ नये, याची दक्षता घ्यावी. अशा मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कोल्हापूर येथे निवासी उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

कोपरगाव येथील हिंदुत्वनिष्ठांच्या संघटितपणामुळे अनधिकृत पशूवधगृहावर कारवाई !

अनधिकृत पशूवधगृहावर कारवाई होण्यासाठी हिंदूंना आंदोलनाची चेतावणी का द्यावी लागते ? याचाच अर्थ प्रशासनाला अवैध बांधकामावर कारवाई करण्याची इच्छा नाही. अशा भ्रष्ट आणि कामचुकार प्रशासनावरच प्रथम कारवाई करायला हवी !

अफगाणिस्तानातील काबुल नदीच्या पाण्याद्वारे अयोध्येतील राममंदिराच्या ठिकाणी जलाभिषेक !

अफगाणिस्तान येथून एका तरुणीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काबुल नदीचे पाणी अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीवर बांधण्यात येणार्‍या श्रीराममंदिराच्या स्थानावर जलाभिषेक करण्यासाठी पाठवले होते.

वाराणसी येथे दुकानावर पाकचा झेंडा फडकावणार्‍या तरुणाला अटक

कुटुंबियांचे म्हणणे की तो मानसिकदृष्ट्या आजारी आहे. तो मानसिकदृष्ट्या आजारी आहे, तर त्याला पाकचाच झेंडा फडकावण्याची बुद्धी कशी होते ? त्याने भारताचा झेंडा का फडकावला नाही ? अशा कथित मनोरुग्णांवर सरकारने आता कठोर उपाय करावेत !

कोरोनाचा प्रसार कसा आणि कुठून झाला, हे कधीच कळणार नाही !

कोरोना विषाणूचा उगम कुठून झाला, हे आम्हाला कधीच कळणार नाही’, असे अमेरिकेच्या एका गुप्तचर संस्थेने तिच्या एका नवीन अहवालात म्हटले आहे. यापूर्वीच्या अहवालात कोरोनासाठी चीनला उत्तरदायी ठरवण्यात आले होते.

काँग्रेस पक्ष राजकारणाविषयी गंभीर नसल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी अधिक शक्तीशाली होणार ! – ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, बंगाल

‘‘काँग्रेस पक्ष राजकारण गांभीर्याने घेत नाही. काँग्रेस पक्ष कोणताच निर्णय घेऊ शकत नाही. मग त्यासाठी देशाने का भोगले पाहिजे ?’’ – ममता बॅनर्जी

ऐन दिवाळीत महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता !

ऐन दिवाळीत राज्यात पावसाची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. राज्यात १ ते ३ नोव्हेंबर या काळात कोकण, दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाडा येथे काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. कुलाबा वेधशाळेनुसार राज्यात २ ते ४ नोव्हेंबर या काळात ढगाळ हवामान राहील.

दीपावलीला नरकासुराला अधिक महत्त्व न देता भगवान श्रीकृष्णाच्या पूजनाला अधिक महत्त्व द्यावे ! – सुदिन ढवळीकर, आमदार, ‘मगोप’

दीपावली सण साजरा करतांना नरकासुराला अधिक महत्त्व न देता जगण्याचा मंत्र देणार्‍या श्रीकृष्णाच्या पूजनाला अधिक महत्त्व द्यावे. मानवतेचे शिक्षण, धर्म, संस्कृती आणि परंपरा समृद्ध करण्यासाठी युवकांनी संघटित होणे आवश्यक आहे.