पुणे – बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणार्या गौरव रामप्रताप सविता या तरुणाला अटक केली. हा मूळचा गुजरात येथील असून त्याच्याकडून ५०० रुपयांच्या १४२ नोटा आणि १०० रुपयांच्या ६१ नोटा असे ७७ सहस्र १०० रुपये जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी पोलीस शिपाई लखन शेटे यांनी समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. समर्थ पोलीस ठाण्यांकडून रात्री सराईतांची पडताळणी करण्यात येत होती. त्याच वेळी रास्ता पेठेतील उंटाड्या मारुति मंदिराजवळ एकजण बनावट नोटा घेऊन थांबल्याची माहिती मिळाली. पोलीस त्या ठिकाणी गेले असता पोलिसांनी गौरव यांना कह्यात घेतले. (केवळ एकालाच अटक न करता या साखळीतील संबंधित सर्वांनाच अटक करणे आवश्यक आहे ! – संपादक)