संभाजीनगर – ऐन दिवाळीत राज्यात पावसाची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. राज्यात १ ते ३ नोव्हेंबर या काळात कोकण, दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाडा येथे काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. कुलाबा वेधशाळेनुसार राज्यात २ ते ४ नोव्हेंबर या काळात ढगाळ हवामान राहील. १ नोव्हेंबर या दिवशी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. २ आणि ३ नोव्हेंबर या दिवशी कोकणासह सोलापूर, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यांत मेघगर्जना, सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
ऐन दिवाळीत महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता, मराठवाड्यातही पाऊस https://t.co/yg9yEKx2cY
— Divya Marathi (@MarathiDivya) October 31, 2021
उत्तर महाराष्ट्रात थंडीचा जोर !
उत्तर महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढत आहे. ३० ऑक्टोबर या दिवशी उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ येथे बर्याच ठिकाणी सरासरीच्या तुलनेत किमान तापमानात घट दिसून आली. याच दिवशी जळगाव येथे राज्यातील सर्वांत अल्प १२ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. नाशिक येथे १२.८, तर संभाजीनगर येथे १४.९ अंश सेल्सियस किमान तापमान नोंदवण्यात आले आहे.