अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेचा दावा
वॉशिंग्टन (अमेरिका) – ‘कोरोना विषाणूचा उगम कुठून झाला, हे आम्हाला कधीच कळणार नाही’, असे अमेरिकेच्या ‘यू.एस्. डायरेक्टर ऑफ नॅशनल इंटेलिजन्स’ या गुप्तचर संस्थेन तिच्या एका नवीन अहवालात म्हटले आहे. या अहवालामध्ये कोरोनाचा संसर्ग हा ‘जैविक शस्त्र’ असल्याचे म्हणणे नाकारले आहे. हा अहवाल अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना ऑगस्टमध्ये जारी केलेल्या ९० दिवसांच्या पुनरावलोकनाचा पुढील भाग आहे.
US intelligence agencies said that they may never be able to identify the origins of Covid-19. #Coronavirus #COVID19 #News https://t.co/zWZp0S0r7O
— IndiaToday (@IndiaToday) October 30, 2021
आतापर्यंत चीनने या नवीन अहवालावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. यापूर्वीच्या अहवालात कोरोनासाठी चीनला उत्तरदायी ठरवण्यात आले होते.