वर्ष २०२२ मध्ये होणार्या गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरील घडामोडी
पणजी, ३१ ऑक्टोबर (वार्ता.) – काँग्रेस पक्ष राजकारणाविषयी गंभीर नसल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी अधिक शक्तीशाली होणार आहेत, असे मत ३ दिवसीय गोवा दौर्यावर असलेल्या बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केले. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पुढे म्हणाल्या, ‘‘काँग्रेस पक्ष राजकारण गांभीर्याने घेत नाही. काँग्रेस पक्ष कोणताच निर्णय घेऊ शकत नाही. मग त्यासाठी देशाने का भोगले पाहिजे ? यासाठी आता प्रादेशिक पक्ष शक्तीशाली होणे आवश्यक आहे.’’
PM Narendra Modi will be more powerful as Congress not serious about politics, says Mamata Banerjee https://t.co/DlrLLPbe9Z
— TOI India (@TOIIndiaNews) October 30, 2021
ममता बॅनर्जी यांनी मंदिरातील तीर्थ भूमीवर टाकून तीर्थाचा अवमान केला ! – सिद्धार्थ कुंकळ्ळेकर, भाजपचे नेते
गोवा भेटीवर आलेल्या बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सध्या गोव्यातील मंदिरांना भेट देत आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी २९ ऑक्टोबर या दिवशी मंगेशी येथील श्री मंगेश मंदिराला भेट दिली. या भेटीच्या वेळी मंदिरातील पुजार्याने दिलेले तीर्थ त्यांनी हातावर घेऊन ते भूमीवर टाकले आणि समवेत असलेल्या सर्वांच्या अंगावर शिंपडले.
(source : Raiganj Kulik News)
तीर्थ प्राशन न करता ते भूमीवर टाकल्याने तीर्थाचा अवमान झाला आहे. तृणमूल काँग्रेसने यापूर्वी मुख्यमंत्री बॅनर्जी यांची तुलना गोव्यातील श्री शांतादुर्गादेवीशी करून देवीचा अवमान केला होता.