अशांना आजन्म कारागृहात डांबण्याची सश्रम शिक्षा करणे आवश्यक ! – संपादक
वाराणसी (उत्तरप्रदेश) – येथील भवानीपूर गावामध्ये शुक्रवारच्या नमाजानंतर स्वतःच्या दुकानावर पाकिस्तानचा राष्ट्रध्वज फडकावणार्या महंमद ताज या २२ वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. झेंडा लावतांना शेजारील लोकांनी त्याला विरोध केला असता त्याने लोकांशी वाद घातला. या वेळी ताज याने पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजीही केली.
Crime News : पाकिस्तानी ध्वज फडकावत नारेबाजी, वाराणसीत युवकावर झाली कारवाई https://t.co/kl98FQXThE
— Lokmat (@lokmat) October 30, 2021
कुटुंबियांचे म्हणणे आहे की तो मानसिकदृष्ट्या आजारी आहे. (जर तो मानसिकदृष्ट्या आजारी आहे, तर त्याला पाकचाच झेंडा फडकावण्याची बुद्धी कशी होते ? त्याने भारताचा झेंडा का फडकावला नाही ? अशा कथित मनोरुग्णांवर सरकारने आता कठोर उपाय करणे आवश्यक झाले आहे ! – संपादक)