मुंबई – सागरी सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. वर्ष २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या आक्रमणानंतर सरकारने बरीच दक्षता घेतली आहे. समुद्रकिनारी रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमानांचे वास्तव्य सहन करणार नाही, तसेच त्यांना सोडणार नाही. त्यांची ‘स्वच्छता मोहीम’ हाती घेऊ. समुद्र किनार्यावर वसणार्या बांगलादेशींचाही बंदोबस्त करण्यात येईल, अशी चेतावणी मत्स आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली. मत्स्य आणि बंदरे मंत्री झाल्यानंतर नितेश राणे यांनी २४ डिसेंबर या दिवशी या खात्याचा पदभार स्वीकारला. त्या वेळी माध्यमांशी बोलत होते.
नितेश राणे म्हणाले, ‘‘मत्स्य आणि बंदरे दोन्ही खात्यांमध्ये काय चालू आहे ? आपण कुठून प्रारंभ करायचा ? याचा मी आढावा घेतला आहे. माझ्या काही अपेक्षा किंवा विकासाच्या अनुषंगाने पालट करण्यासाठी काय करता येईल, यासाठी काही सूचना दिल्या आहेत. आताही काही जिहादी सक्रीय राहून सागरी किनार्यावर काम करत आहेत. त्यामुळे त्यासाठी काय करता येईल, यादृष्टीने प्रयत्न करणार आहे.’’