मुंबई – बांगलादेशात हिंदू अल्पसंख्याकांवर होणार्या अत्याचारांविषयी सरकार पावले उचलत आहे; मात्र आता आणखी कठोर भूमिका घेण्याची आवश्यकता आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कठोर भूमिका घेण्यास सांगीन, असे प्रतिपादन स्वामी रामभद्राचार्य यांनी येथे पत्रकारांशी बोलतांना केले.
मंदिर पुनर्स्थापनेचा प्रयत्न करणार !
स्वामी रामभद्राचार्य म्हणाले, ‘‘जिथे पुरातन मंदिरांचे पुरावे उपलब्ध आहेत, तेथे आम्ही त्यांची पुनर्स्थापना करण्याचा प्रयत्न करू. ही आमच्यासाठी नवीन कल्पना नाही, तर सत्याच्या आधारे आपली संस्कृती आणि धर्म यांचे जतन करणे आवश्यक आहे. उत्तरप्रदेशातील संभल येथे झालेल्या हिंसाचारात लोकांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी आहे. हिंदूंनी संघटित व्हावे, त्यांचे ध्रुवीकरण होऊ नये.’’