अनधिकृत पशूवधगृहावर कारवाई होण्यासाठी हिंदूंना आंदोलनाची चेतावणी का द्यावी लागते ? याचाच अर्थ प्रशासनाला अवैध बांधकामावर कारवाई करण्याची इच्छा नाही. अशा भ्रष्ट आणि कामचुकार प्रशासनावरच प्रथम कारवाई करायला हवी ! – संपादक
कोपरगाव (जिल्हा नाशिक) – येथील हिंदुत्वनिष्ठांच्या संघटितपणामुळे अनधिकृत पशूवधगृहावर प्रशासनाने कारवाई करत ते भुईसपाट केले. शहरात मोठ्या प्रमाणावर या पशूवधगृहात गोवंशियांची कत्तल केली जात असल्याने हिंदुत्वनिष्ठांनी कारवाईची मागणी केली होती. हिंदुत्वनिष्ठांनी संघटितपणे या पशूवधगृहावर कारवाई करण्याविषयी प्रशासनाचा पाठपुरावा केला; पण प्रशासन कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचे हिंदुत्वनिष्ठांनी सांगितले. कारवाई होत नसल्याने येथील हिंदुत्वनिष्ठांनी प्रशासनाला ३१ ऑक्टोबरपर्यंत कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाची चेतावणी दिली होती. हिंदुत्वनिष्ठांच्या संघटितपणामुळे शेवटी अनधिकृत पशूवधगृहावर प्रशासनाने कारवाई चालू केली. या वेळी प्रशासनातील मोठे अधिकारी उपस्थित होते आणि पोलिसांचा मोठा फौजफाटाही उपस्थित होता.