आजपासून श्री साई पालखी निवारा येथे तृतीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद’ !

विविध राज्यातील मंदिरप्रेमींचे उत्साहात आगमन !

शिर्डी – मंदिरांचे प्रभावी संघटन, मंदिरांचे सुप्रबंधन यांसह मंदिरांच्या विविध समस्यांवर उपाययोजना काढणे यांसाठी २४ आणि २५ डिसेंबर या दिवशी श्री साई पालखी निवारा, शिर्डी येथे तृतीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद’ होत आहे. २ दिवसांच्या या परिषदेत मान्यवरांचे उद्बोधन, परिसंवाद आणि चर्चासत्रे होणार आहेत. २३ डिसेंबरला या परिषदेसाठी राज्यातून पुणे, अमरावती, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, संभाजीनगर, रत्नागिरी, मुंबई, नागपूर यांसह जवळपास प्रत्येक जिल्ह्यातून विविध मंदिरांचे विश्वस्त, पुजारी, प्रतिनिधी यांनी मोठ्या उत्साहात विविध गाड्यांमधून शिर्डीकडे निघाले.

‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’मधील महत्त्वाची सूत्रे 

१. मंदिर सुव्यवस्थापन, तसेच मंदिरातील पवित्रता-धार्मिकता टिकवणे यांवर विशेष मार्गदर्शन

२. मंदिरांच्या संरक्षणार्थ परिसंवाद

३. ‘मंदिरे सनातन धर्मप्रचाराची केंद्रे बनवणे’, ‘मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करणे’, ‘वक्फ कायद्या’द्वारे मंदिरांच्या भूमीवर अतिक्रमण आणि मंदिरे बळकावणे यांवर चर्चा आणि उपाय

४. दुर्लक्षित मंदिरांचा जीर्णोद्धार यांवर चर्चा आणि उपाय, भक्तांना विविध उपक्रमांच्या माध्यमातून मंदिरांशी कसे जोडावे ? यांवर तज्ञांचे मार्गदर्शन