अयोध्या – श्रीराममंदिराच्या निर्मितीसाठी हिंदूंच्या ५०० वर्षांच्या संघर्षाची गाथा लवकरच दूरदर्शनवर दाखवण्यात येणार आहे. यासाठी ‘श्रीराममंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्ट’कडून ५ भागांचा लघुपटही बनवण्यात आला आहे. यातील प्रत्येक भाग हा ३० ते ४० मिनिटांचा असेल. केंद्र सरकारची अनुमती मिळाल्यानंतर हा लघुपट प्रदर्शित करण्यात येणार आहे. या लघुपटात हिंदूंनी श्रीराममंदिरासाठी ५०० वर्षांपासून दिलेला लढा, तसेच स्वातंत्र्यानंतर न्यायालयीन लढ्यात हिंदूंनी दिलेले पुरावे समाजासमोर आणण्यासाठी हा लघुपट बनवण्यात आल्याचे ट्रस्टने सांगितले. काही दिवसांपूर्वी ट्रस्टचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्र यांनीही ही माहिती दिली होती.