कुडाळ येथे गोवंशियांची अवैध वाहतूक संतप्त नागरिकांनी रोखली : ३ धर्मांधांना १ दिवसाची पोलीस कोठडी

कंटेनरमध्ये गोवंश आहे, हे स्वतः न पहाणार्‍या आणि गोप्रेमींचा मागणीनंतरही कंटेनर उघडण्यास नकार देणार्‍या पोलिसांचे कसायांशी लागेबांधे आहेत का ? याचे अन्वेषण करावे !

नक्षलवाद्यांच्या धमक्यांना भीक घालत नाही, विकासकामे चालूच ठेवणार ! – एकनाथ शिंदे, पालकमंत्री

जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वीकारतांना अशा धमक्या येण्याची शक्यता मी आधीच गृहित धरली होती. नक्षलवाद्यांच्या धमक्यांना मी स्वतः भीक घालत नाही. जिल्ह्याच्या विकासासाठी मी सतत प्रयत्नशील असून विकास हेच नक्षलवाद समाप्तीचे प्रमुख लक्षण आहे आणि जिल्ह्यातील नागरिकांना आता ते समजून चुकले आहे

नरकासुराच्या प्रतिमा बनवणार्‍यांना लोकप्रतिनिधींकडून मोठ्या प्रमाणावर आर्थिक साहाय्य

राज्य आर्थिक संकटात असतांना नरकासुराच्या प्रतिमांवर पैसा खर्च करणे; म्हणजे नरकासुराच्या प्रतिमेसमवेत तो पैसा जाळल्याप्रमाणेच आहे !

चीनविरुद्ध बहिष्कारास्र !

आर्थिक नाडी ही कोणताही देश, संघटना अथवा व्यक्ती यांची दुखरी नस आहे. ही नस भारतियांना सापडली आहे. ही नस दाबून चीनला पुरते गुदमरवून टाकण्याची संधी भारताकडे आहे. ही संधी साध्य करावी, ही अपेक्षा !

जळगाव येथे युवा सेनेच्या वतीने इंधन दरवाढीच्या निषेधार्थ ‘सायकल फेरी’ !

मोदी सरकारने इंधन दरवाढ तात्काळ नियंत्रणात आणून सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा. आज महागाई अनियंत्रित असून सर्वसामान्य जनतेला उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे, असे सांगत ‘हे मोदी सरकार भांडवलदारांच्या हितासाठी सर्वसामान्य जनतेला वेठीस धरत आहे’, असा आरोप युवा शिवसैनिकांनी केला. 

महामारीपासून बोध…!

कोरोनाच्या आपत्तीतही धर्मांतर, जिहाद आणि साम्राज्यवादी मनोवृत्तीने काही जण धर्माच्या नावे षड्यंत्र आखत राहिले, कोणतेही भय मनात न ठेवता त्यांची कट-कारस्थाने चालूच राहिली. याचा हिंदूंनी काही विचार तरी केला आहे का ?

कोल्हापूर येथील आखरी रस्त्याच्या कामाचा राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते शुभारंभ !

आखरी रस्त्याच्या कामास प्रारंभ केल्याविषयी प्रभाग क्रमांक २९, ३० आणि ५० मधील नागरिकांच्या वतीने श्री. राजेश क्षीरसागर यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.

सण-उत्सवांच्या कालावधीत फसवणूक टाळण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहून अन्नपदार्थ विकत घ्यावेत ! – मोहन केंबळकर, साहाय्यक आयुक्त, अन्न आणि औषध प्रशासन

‘सुराज्य अभियान’ आणि ‘आरोग्य साहाय्य समिती’ या उपक्रमांच्या अंतर्गत ‘अन्नभेसळ कशी ओळखावी अन् त्यासाठीचे उपाय’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष परिसंवाद !

शहागड येथील बुलढाणा अर्बन पतसंस्था लुटणार्‍या दोघांना २४ घंट्यांत अटक !

जिल्ह्यातील शहागड येथे २८ ऑक्टोबर या दिवशी बुलढाणा अर्बन पतसंस्थेत बंदुकीचा धाक दाखवत ३ दरोडेखोरांनी रोख रक्कम आणि दागिने, असा ३ कोटी ५० लाख रुपयांचा मुद्देमाल लुटून नेला होता. या प्रकरणातील २ दरोडेखोरांना २४ घंट्यांत पकडून अटक केली आहे.

बुलढाणा येथील केळवद स्टेट बँकेच्या शाखेत दरोडा !

चिखली तालुक्यातील केळवद येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेवर ३० ऑक्टोबरच्या मध्यरात्री दरोडा पडला आहे.