हिंदु धर्माचे मूल्य नसलेले भारतातील हिंदू !

‘उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला प्रयाण करतात, त्याप्रमाणे साधना आणि हिंदु धर्म यांच्या शिक्षणासाठी जगभरचे जिज्ञासू अन् साधक भारतात येतात. असे असले, तरी भारतातील हिंदूंना हिंदु धर्माचे मूल्य नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

तमिळनाडूतील मंदिरांचे २ सहस्र १३८ किलो सोने वितळवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला मद्रास उच्च न्यायालयाची मनाई !

असा अधिकार नास्तिकतावादी द्रमुकच्या सरकारला कुणी दिला ? द्रमुकने असा हस्तक्षेप अन्य धर्मियांच्या धार्मिक स्थळांच्या संदर्भात करण्याचे धाडस केले असते का ?

पाटलीपुत्र येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत झालेल्या बाँबस्फोटांच्या प्रकरणातील ४ धर्मांधांना ८ वर्षांनी फाशीची शिक्षा

मोदी यांच्यासारख्या व्यक्तींच्या संदर्भातील प्रकरणे जलद गती न्यायालयात चालवून निकाल लवकर लावणे, जनतेच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचे ठरेल !

(म्हणे) ‘महंमद अली जीना हे स्वातंत्र्यलढ्याचे नायक होते !’ – अखिलेश यादव, अध्यक्ष, समाजवादी पक्ष

मुसलमानांच्या मतांसाठी देशाच्या फाळणीला आणि त्यानंतर झालेल्या १० लाख हिंदूंच्या हत्याकांडाला उत्तरदायी असलेल्या जिनांचा असा उदोउदो करणार्‍या अखिलेश यादव यांना सरकारने कारागृहात टाकून त्यांच्या पक्षावर बंदी घातली पाहिजे !

हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या ‘चलो मडगाव’ या हाकेला प्रतिसाद देत दीड सहस्रांहून अधिक हिंदू गोव्यामध्ये एकवटले !

दवर्ली परिसरात ईदच्या निमित्ताने लावण्यात आलेले इस्लामी झेंडे निर्धारित मुदतीत हटवण्यात न आल्याने पुढील धोरण निश्चित करण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी ३१ ऑक्टोबर या दिवशी दुपारी ‘चलो मडगाव’ अशी हाक समस्त हिंदूंना दिली होती.

अग्निहोत्राचा प्रसार करणारे प.पू. स्वामीमय सद्गुरु दादाश्री मोहन जाधव (वय ८० वर्षे) यांचा देहत्याग !

प्रतिदिन अग्निहोत्र करणारे आणि अग्निहोत्राचा भारतासह विदेशातही प्रसार करणारे प.पू. स्वामीमय सद्गुरु दादाश्री मोहन जाधव (वय ८० वर्षे) यांनी पुणे येथे २६ ऑक्टोबर २०२१ या रात्री ११ वाजता देहत्याग केला.

नवाब मलिक यांचा ‘अंडरवर्ल्ड’शी संबंध, शरद पवार यांना पुरावे पाठवणार ! – देवेंद्र फडणवीस

मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांचे अमली पदार्थांचा पुरवठादार जयदीप राणा याच्यासमवेत असलेले छायाचित्र प्रसारित केले आहे.