
मुंबई – नवाब मलिक यांनी लवंगी फटाका लावलाय. आता त्यांनी लक्षात ठेवावे, दिवाळी झाल्यानंतर बाँब मी फोडणार आहे. मी काचेच्या घरात रहात नाही. त्यांचे संबंध ‘अंडरवर्ल्ड’समवेत आहेत. याविषयी शरद पवार यांना पुरावे पाठवणार आहे, असे प्रत्युत्तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांच्या आरोपांवर दिले. ‘राज्यातील अमली पदार्थांच्या धंद्याचे ‘मास्टर माईंड’ देवेंद्र फडणवीस आहेत’, असा गंभीर आरोप मलिक यांनी केला आहे. त्यावर फडणवीस यांनी वरील उत्तर दिले.
मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांचे अमली पदार्थांचा पुरवठादार जयदीप राणा याच्यासमवेत असलेले छायाचित्र प्रसारित केले आहे. याविषयी स्पष्टीकरण देतांना देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘नवाब मलिक यांनी प्रारंभ केला आहे. त्या आरोपाला आता शेवटपर्यंत न्यावे लागेल. नवाब मलिक यांनी जाणीवपूर्वक माझ्या पत्नीसमवेतचे छायाचित्र प्रसारित करून स्वत:ची मानसिकता दाखवून दिली आहे. राणा आणि आमचा काहीही संबंध नाही.’’
राष्ट्रीय आयोगाकडून पिंपरी-चिंचवड महापालिकेला नोटीस !
शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे पोलिसांना शरण !
प्रत्येक पात्र मतदाराची अचूक नोंद सुनिश्चित करावी ! – एस्. चोकलिंगम, मुख्य निवडणूक अधिकारी
अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याने हॉटेल, बेकरी, डेअरी यांचे परवाने निलंबित !
उल्हासनगर येथील गोठ्यांतून ‘ऑक्सिटोसिन’च्या ६१२ बाटल्या जप्त !
‘राजेश नाईक फाऊंडेशन’कडून फलटण येथे वारकर्यांना राजगिराचे लाडू, तसेच फराळ वाटप !