पाटलीपुत्र येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत झालेल्या बाँबस्फोटांच्या प्रकरणातील ४ धर्मांधांना ८ वर्षांनी फाशीची शिक्षा

  • मोदी यांच्यासारख्या व्यक्तींच्या संदर्भातील प्रकरणे जलद गती न्यायालयात चालवून निकाल लवकर लावणे, जनतेच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचे ठरेल ! – संपादक
  • ‘भगवा आतंकवाद’ म्हणणारे आता ‘इस्लामी आतंकवाद’ म्हणणार का ? – संपादक 
पाटलीपुत्र येथे झालेल्या बाँबस्फोटांच्या प्रकरणातील धर्मांध आरोपी

पाटलीपुत्र (बिहार) – येथील गांधी मैदानात २७ ऑक्टोबर २०१३ या दिवशी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सभेमध्ये झालेल्या साखळी बाँबस्फोटांच्या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या विशेष न्यायालयाने हैदर अली, नोमान अंसारी, महंमद मुजिबुल्लाह अंसारी आणि इम्तियाज आलम या ४ दोषींना फाशीची शिक्षा सुनावली.

या प्रकरणी न्यायालयाने एकूण ९ जणांना दोषी ठरवले आहे. उर्वरित आरोपींपैकी उमर सिद्दीकी आणि अझहरुद्दीन कुरैशी या दोघांना जन्मठेप, अहमद हुसैन आणि महंमद फिरोज असलम या दोघांना १० वर्षे, तर इफ्तिखार आलम याला ७ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. या स्फोटांमध्ये ६ लोकांचा मृत्यू झाला होता, तर ८० जण घायाळ झाले होते.