मनकर्णिका कुंडाच्या उत्खननाचे काम लवकरात लवकर पूर्ण करून भाविकांसाठी कुंड खुले करा ! – सुनील घनवट, प्रवक्ते, श्री महालक्ष्मी देवस्थान भ्रष्टाचारविरोधी कृती समिती

श्री महालक्ष्मी मंदिरातील मनकर्णिका कुंड खुले करण्याच्या कामास प्रारंभ होणे हा श्री महालक्ष्मी देवस्थान भ्रष्टाचारविरोधी कृती समितीने दिलेल्या लढ्यातील एक विजय !

सचिन वाझे यांच्या अटकेचा सरकारच्या भवितव्यावर कोणताही परिणाम नाही ! – शरद पवार, राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

सचिन वाझे यांचे राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून अन्वेषण चालू आहे. जे चुकीचे काम किंवा पदाचा दुरुपयोग करत आहेत, त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी. त्यासाठी सहकार्य करू.

शरजील उस्मानी याला जामीन मिळवण्यासाठी महाविकास आघाडी सरकारचे साहाय्य ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते विधानसभा

शरजील उस्मानी यांच्या विरोधात नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्यामध्ये भादंविचे ‘२९५ अ’ हे विशिष्ट धर्माला लक्ष्य करण्यासाठी लावले जाणारे कलम पद्धतशीरपणे वगळण्यात आले.

अधिकोषांच्या गोपनीय डाटा चोरीप्रकरणात पुणे येथे ९ जणांना अटक !

अधिकोषांमध्ये असलेल्या निष्क्रीय खात्यांचा गोपनीय डाटा अवैध मिळवून त्याद्वारे अब्जावधी रुपयांची फसवणूक करण्याच्या प्रयत्नात असलेल्या आंतरराज्य टोळीला सायबर गुन्हे शाखेने पकडले आहे.

बारावी जीवशास्त्राच्या पुस्तकात व्याकरणाच्या चुकांसह वस्तूनिष्ठ आणि वैज्ञानिक माहितीच्याही असंख्य चुका !

पुस्तकात व्याकरणाच्या मूलभूत चुकांपासून चुकीची वैज्ञानिक माहिती देण्यापर्यंतच्या चुका असणे हे  गंभीर आणि लज्जास्पद आहे ! यावरून मंडळातील सदस्यांचा अक्षम्य निष्काळजीपणाच उघड होतो !

‘सुर-ताल हुनर का कमाल’ या नृत्यस्पर्धेत भाग घेतल्यानंतर नृत्याचा सराव करतांना कु. अंजली कानस्करला आलेल्या अनुभूती

घरी सराव करतांना माझे नृत्य एका दमात होत नव्हते. अर्ध्या गीतानंतर मला दमायला व्हायचे; पण नृत्याच्या चित्रीकरणाच्या वेळी देवी आणि गुरुदेव यांच्या कृपेने मला न थांबता पूर्ण नृत्य करता आले.

बैरागी कॅम्पमधील सर्व आखाड्यांना ७ दिवसांत सर्व सुविधा देणार ! – दीपक रावत, कुंभमेळा अधिकारी

हिंदूंच्या कुंभमेळ्यासारख्या महत्त्वाच्या कार्यक्रमांना किमान पायाभूत सुविधा मिळवण्यासाठी साधूसंतांना प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करावा लागत असेल, तर असे प्रशासन काय कामाचे ? अन्य धर्मियांविषयी प्रशासनाने अशी उदासीनता दाखवली असती का ?

श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी केवळ १ सहस्र ५०० भाविकांना दिला जाणार प्रवेश !

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने केवळ १ सहस्र ५०० भाविकांनाच दर्शनासाठी मंदिरात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे.

पोलीस बहिरे आहेत का ?

प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथील अलाहाबाद केंद्रीय विद्यापिठाच्या कुलगुरु प्रा. संगीता श्रीवास्तव यांनी मशिदींवरील भोंग्यांवरून पहाटे देण्यात येणार्‍या अजानमुळे झोपमोड होत आहे, अशी तक्रार जिल्हाधिकारी भानूचंद्र गोस्वामी यांना पत्र लिहून केली आहे.

अजय गोसालिया यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी कुख्यात गुंड छोटा राजन याला १० वर्षांचा कारावास !

बांधकाम व्यावसायिक अजय गोसालिया यांच्यावर गोळ्या झाडून हत्येचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणी कुख्यात गुंड छोटा राजन याला मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सी.बी.आय्. न्यायालयाने १० वर्षांची शिक्षा आणि ५ लाख रुपये इतका दंड ठोठावला आहे.