
मुंबई – शरजील उस्मानी यांच्या विरोधात नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्यामध्ये भादंविचे ‘२९५ अ’ हे विशिष्ट धर्माला लक्ष्य करण्यासाठी लावले जाणारे कलम पद्धतशीरपणे वगळण्यात आले. शरजील उस्मानी याला जामीन मिळण्यासाठी महाविकास आघाडी सरकारचे साहाय्य आहे, असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी फेसबूकवरून केला आहे.
या फेसबूक पोस्टमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे, ‘‘आपले मुख्यमंत्री विधानसभेत छातीठोकपणे म्हणाले की, शरजील उस्मानी जगाच्या कुठल्याही कोपर्यात असला, तरी त्याच्या मुसक्या आवळून शोधून आणू. प्रत्यक्षात तो जबाब देऊन गेला. महाविकास आघाडी सरकारने काय केले ? माननीय उद्धवजी सत्तेसाठी आणखी किती लोकांना वाचवणार ?’’