थकीत वीजदेयके टप्प्याटप्प्याने भरण्यास सवलत द्यावी, अन्यथा संघर्ष अटळ ! – उदयनराजे भोसले

थकबाकीमुळे वीजजोडणी तोडण्याची कारवाई होणार असेल, तर ते कदापि सहन केले जाणार नाही. अशा वेळी आम्ही ग्राहकांच्या बाजूने ठामपणे उभे राहू,असेही ते पुढे म्हणाले

शस्त्रक्रियांचे स्वयंघोषित ठेकेदार !

ही वेळ पॅथींमध्ये स्पर्धा लावून ‘कोण श्रेष्ठ आणि कोण कनिष्ठ ?’ ही ठरवण्याची नाही. खेडोपाडी रुग्णसेवा बजावण्यास केव्हाही सिद्ध असणारे वैद्य निर्माण करण्याची ही वेळ आहे. यासाठी वैद्यकीय संघटनांनी स्वतःची ऊर्जा खर्ची घातली, तर समाजाचे भले होईल !

सचिन वाझे यांना ‘ऑपरेट’ करणार्‍या सरकारमधील लोकांचा शोध घ्या ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, विधानसभा

परमवीर सिंह यांना पदावरून हटवून हे प्रकरण संपणार नाही. सिंह आणि वाझे हे छोटे लोक आहेत. त्यांना कुणाचा आशीर्वाद आहे, याचा शोध घ्यायला हवा.

‘मिग-२१’च्या अपघातात ग्रुप कॅप्टनचा मृत्यू

उडत्या शवपेट्या असलेली भारतीय वायूदलाची मिग-२१ विमाने ! आणखी किती वर्षे असे अपघात होत रहाणार ?

पांडे-खानापूर (जिल्हा सातारा) सीमेलगत शेतात टाकलेल्या मळीने विहिरीचे पाणी होणार दूषित

पांडे-खानापूर सीमेलगत दिलीप नथुराम चव्हाण यांच्या मालकीची शेतभूमी आहे. त्यांच्या शेजारी संतोष घाटे यांची शेतभूमी आहे. घाटे यांनी शेतात १० ते १२ ट्रॅक्टर मळी टाकली आहे.

वैदिक आर्य संस्कृती हीच भारतियांचा आणि हिंदूंचा प्राण !

वैदिक आर्य संस्कृती ही भारतियांचा आणि हिंदूंचा प्राणच होय. ती नष्ट झाल्यास हिंदु समाज मृतवत् झाल्यासारखाच होईल.

मुंबई पोलिसांची मलीन झालेली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करीन ! – हेमंत नगराळे, पोलीस आयुक्त, मुंबई

मुंबई पोलीस सध्या एका कठीण समस्येतून जात आहेत. ती समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने माझी नियुक्ती केली आहे. येत्या काळात मुंबई पोलिसांची मलीन झालेली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करीन.

बाळ बोठे यांची बडदास्त ठेवली जात आहे ! – रूणाल जरे यांचा आरोप

आरोपीला मदत करण्यापर्यंत पोलिसांची मजल कशी जाते ? असा प्रश्‍न सर्वसामान्यांना पडल्यास नवल काय ? याचाच अर्थ पाणी कुठेतरी मुरत आहे, असेच सर्वसामान्यांना वाटेल !

पुण्यातील शिवाजी मार्केटला लागलेल्या आगीत २५ दुकाने जळून खाक !

पुणे येथील कॅम्प परिसरातील शिवाजी मार्केटला १६ मार्च या दिवशी पहाटे चार वाजता भीषण आग लागली होती. त्यानंतर १ घंट्यांच्या अथक प्रयत्नानंतर अग्नीशमन दलाच्या पथकाने आगीवर नियंत्रण मिळवले.

सैनिक भरतीची वयोमर्यादा वाढवा ! – श्रीनिवास पाटील, खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस

सातारा जिल्ह्यातील बहुतांश युवक सैन्यात भरती होण्यासाठी प्राधान्य देतात. त्यासाठी शारीरिक आणि बौद्धिक परिश्रम घेतात; मात्र सैन्य भरती वारंवार पुढे ढकलली जात असल्याने इच्छुक युवकांची वयोमर्यादा संपण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.