अजय गोसालिया यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी कुख्यात गुंड छोटा राजन याला १० वर्षांचा कारावास !

छोटा राजन

मुंबई – बांधकाम व्यावसायिक अजय गोसालिया यांच्यावर गोळ्या झाडून हत्येचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणी कुख्यात गुंड छोटा राजन याला मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सी.बी.आय्. न्यायालयाने १० वर्षांची शिक्षा आणि ५ लाख रुपये इतका दंड ठोठावला आहे.

वर्ष २०१३ मध्ये मालाड येथील इन्फिनिटी मॉलच्या बाहेर गोसालिया यांच्यावर ३ जणांनी गोळीबार केला होता. या गोळीबारातून गोसालिया वाचले. खंडणी न दिल्यामुळे छोटा राजन याच्या सांगण्यावरून हे आक्रमण करण्यात आले असल्याचे पोलीस अन्वेषणात उघड झाले. पत्रकार जे.डे. हत्येच्या चौकशीच्या वेळी ही माहिती पोलिसांना मिळाली. पत्रकार जे.डे. यांच्या हत्येप्रकरणी छोटा राजन याला यापूर्वी न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.