नर्मदेचे जगन्नाथ !

कुंटे यांनी भोंदूबाबांच्या विरोधात आवाज उठवला. त्यासह ‘देवाला मानणे’ ही अंधश्रद्धा आहे’, असे म्हणणार्‍या अंधश्रद्धावाल्यांच्या विरोधातही ते परखडपणे बोलले. ‘साधना केल्यानेच खर्‍या अर्थाने जाती-धर्माच्या भिंती गळून पडतात’, असे त्यांचे प्रांजळ मत.

‘संतांचा आशीर्वाद, हेच उपचार केल्याचे बिल !’, असे प.पू. दास महाराज यांना सांगणारे कुडाळ येथील नेत्रतज्ञ डॉ. संजय सामंत !

प.पू. दास महाराज यांनी त्यांना ‘देयक (बिल) किती ?, ते विचारले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘काही नाही. बिलाचे पैसे शाश्‍वत टिकणार नाहीत. तुम्ही दिलेला आशीर्वाद कायमचा टिकेल ! परात्पर गुरु डॉक्टरांनी आम्हाला भरभरून दिले.’’

पुणे येथील ओशो आश्रमातील २ भूखंड आश्रम विश्‍वस्तांकडून विक्रीला !

दळणवळण बंदीच्या काळात मोठ्या प्रमाणात आश्रमाची हानी झाली. खर्च वाढल्याने आश्रमाला पैशाची गरज असल्याने भूखंड विक्रीला काढल्याचे ट्रस्टने सांगितले.

शेतकर्‍यांना ३ लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी पीक कर्ज आणि महिलांसाठी ‘राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजना’

अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ८ मार्च या दिवशी विधानसभेत महाविकास आघाडी शासनाचा दुसरा अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प १० सहस्र २२६ कोटी रुपये तुटीचा आहे.

मानसिक संतुलन बिघडलेल्या तरुणाने वडिलांसह आजोबांचा खून करून आत्महत्या केली

मानसिक संतुलन बिघडलेल्या तरुणाने वडिलांसह आजोबांचा खून करून स्वत: आत्महत्या केल्याची घटना मुलुंडमध्ये घडली आहे. मुलुंड पश्‍चिमेकडील वसंत ऑस्कर सोसायटीत ही घटना घडली.

मल्हारपेठ (जिल्हा सातारा) येथील अतिक्रमित झुणका-भाकर केंद्र प्रशासनाने पाडले !

पाटण तालुक्यातील तहसील कार्यालयाच्या जागेतील वादग्रस्त झुणका-भाकर केंद्राचे अतिक्रमण प्रशासनाने पाडले. पोलिसांच्या उपस्थितीमध्ये तहसीलदार योगेश्‍वर टोपे यांनी हे अतिक्रमण पाडले. जिल्हा पुरवठा विभागाने शेवटची नोटीस देऊन संबंधित केंद्रचालकास म्हणणे मांडण्यास सांगितले.

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा त्रिपुरा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधिशाकडून रहित

न्यायाधीश अकील कुरेशी यांनी श्रीमद्भगवद्गीतेचा ‘ठकबाजी गीता’ असा उल्लेख करणार्‍याच्या विरोधात नोंदवण्यात आलेला गुन्हा रहित केला.

३२ मण सुवर्ण सिंहासनाला खडा पहारा देण्यासाठी तरुणांनी पुढे यावे ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी

बलीदान मास’ प्रत्येक घरात पाळला गेला पाहिजे. त्याचप्रमाणे ३२ मण सुवर्ण सिंहासनासाठी नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून ४ सहस्र धारकर्‍यांची नोंदणी करा. – पू. संभाजीराव भिडेगुरुजी

महिलांनो, सक्षम होण्यासाठी स्वरक्षण प्रशिक्षण घ्या ! – कु. रागेश्री देशपांडे, रणरागिणी शाखा

‘लव्ह जिहाद’चे संकट तर आता दारापर्यंत येऊन पोचले आहे. हे सर्व रोखण्यासाठी धर्मशिक्षण आवश्यक आहे. यासाठी समितीच्या वतीने विनामूल्य स्वरक्षण प्रशिक्षण आणि धर्मशिक्षणही दिले जाते. सर्व भगिनींनी याचा लाभ घ्यावा !’

नाशिक येथे होणारे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थगित

कोरोनाचा संसर्ग न्यून झाल्यावर पुढील दिनांक घोषित करू, अशी माहिती मराठवाडा साहित्य परिषदेने दिली आहे.