सोलापूर – मंदिरांवरील, तसेच मंदिराच्या भूमीवरील अतिक्रमणे तात्काळ हटवण्यात यावीत, या मागणीसाठी प्रत्येक आठवड्याला ‘मंदिर तेथे सामूहिक आरती’ करण्याचा निर्णय नुकताच शिर्डी येथे ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’त शेकडो मंदिरांच्या विश्वस्तांनी घेतला होता. त्याप्रमाणे या अनुषंगाने सोलापूर येथील ‘श्री वैष्णव मारुति देवस्थाना’त राज्यातील पहिली ‘सामूहिक आरती’ मोठ्या उत्साहाने आणि भावपूर्ण वातावरणात मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली, अशी माहिती ‘मंदिर महासंघा’चे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
🪔 🛕 Initiation of ‘Collective Aarti at Every Temple’! 🛕🪔
🛕 Starting from Shree Vaishnav Maruti Temple, Solapur, as resolved in the Maharashtra Mandir Nyas Parishad at Shirdi! 🙏
📅 The 3rd Parishad, held on December 24-25 in Shirdi, was attended by 875+ Mandir trustees and… pic.twitter.com/iGpnbFPLio
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) December 28, 2024
या प्रसिद्धीपत्रकात श्री. घनवट यांनी पुढे नमूद केले आहे की,
१. सोलापूर येथील श्री वैष्णव मारुति देवस्थान, जुने घरकुल या ठिकाणी महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि श्री वैष्णव मारुति देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सामूहिक आरती’ करण्यात आली. या वेळी मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट, श्री वैष्णव मारुति देवस्थानाचे अध्यक्ष श्री. भास्कर राऊळ, विश्वस्त श्री. दीपक परदेशी, श्री. नारायण दुभाषी, श्री. रामकृष्ण सुंचू, श्री. श्रीनिवास कोत्तायम, श्री गणेश मंदिराचे अध्यक्ष श्री. वेणूगोपाल म्याना, श्री चौडेश्वरी मंदिराचे पुजारी श्री. गोवर्धन म्याकल, ‘पद्माशाली पुरोहित संघटने’चे सदस्य श्री. व्यंकटेश जिल्ला, ‘श्री परमेश्वरी देवस्थाना’चे पुजारी श्री. विठ्ठल पांढरे, हिंदुत्वनिष्ठ श्री. विजय इप्पाकायल, श्री. धन्यकुमार चिंदे, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे श्री. विनोद रसाळ, हिंदु जनजागृती समितीचे श्री. संकेत पिसाळ, श्री. गौरीशंकर कलशेट्टी, श्री. धनंजय बोकडे आणि श्री. बालराज दोंतुल यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
सोलापूर येथील श्रीवैष्णव मारुती देवस्थानात राज्यातील पहिली ‘सामूहिक आरती’ मोठ्या उत्साहाने आणि भावपूर्ण वातावरणात मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली
सोलापुर के श्रीवैष्णव मारुति देवस्थान में राज्य की पहली ‘सामूहिक आरती’ बड़े उत्साह और भावपूर्ण वातावरण में मान्यवरों की उपस्थिति… pic.twitter.com/GVM8bJfKV0
— Sunil Ghanwat 🛕🛕 (@SG_HJS) December 28, 2024
२. २४ आणि २५ डिसेंबरला श्री साई पालखी निवारा, निमगांव, शिर्डी येथे झालेल्या तृतीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’त महाराष्ट्रभरातून ८७५ हून अधिक निमंत्रित मंदिराचे विश्वस्त, प्रतिनिधी, पुरोहित, मंदिरांच्या रक्षणासाठी लढा देणारे अधिवक्ते तथा मंदिर अभ्यासक सहभागी झाले होते. यात प्रामुख्याने मंदिरे, तसेच मंदिरांच्या भूमीवर झालेल्या अतिक्रमणाच्या विरोधात प्रत्येक आठवड्यातून एकदा ‘मंदिर तेथे सामूहिक आरती’ करणे, काशी आणि मथुरा तीर्थक्षेत्रांचा खटला जदल गती न्यायालयात चालवावा, सरकारने राज्यातील सर्व मंदिरे सरकारमुक्त करून ती भक्तांच्या स्वाधीन करावीत, मंदिरात भक्तांनी अर्पण केलेला निधी महाराष्ट्र सरकारने विकासकामांसाठी न वापरण्याची घोषणा करावी, मंदिर परिसर ‘मद्य-मांस मुक्त’ होण्यासाठी सरकारने अधिसूचना काढावी, राज्यातील मंदिरांच्या पुजार्यांना प्रतिमास मानधन देण्याचा निर्णय घ्यावा आदी प्रमुख मागण्या ठरावांद्वारे सरकारकडे करण्यात आल्या होत्या. या मागण्या सरकारने तात्काळ पूर्ण करण्यात याव्यात, अशी मागणी मंदिर महासंघाचे श्री. घनवट यांनी केली आहे.