मथुरा (उत्तरप्रदेश) येथील शिवमंदिरावर अनुसूचित जातीच्या तरुणांकडून आक्रमण करून मूर्तींची तोडफोड

मंदिरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र लावण्याचा प्रयत्न

मथुरा (उत्तरप्रदेश) – येथील स्थानिक मंदिरात काही तरुणांनी हिंदूंच्या देवतांच्या मूर्ती फोडल्या आणि मंदिराबाहेर फेकल्या. या तरुणांनी मंदिरातील देवतांची चित्रेही जाळली. यानंतर मंदिरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. मंदिरावर आक्रमण केल्याचा आरोप अनुसूचित जातीतील तरुणांवर आहे. २६ डिसेंबरच्या रात्री मथुरेतील उदियागढी गावात ही घटना घडली. पोलिसांनी संबंधितांवर गुन्हा नोंदवला आहे.

मंदिरातील तोडफोडीच्या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ तेथे पोचल्यानंतर तरुण पळून गेले. त्यानंतर पोलिसांना बोलावण्यात आले. पोलिसांनी संतप्त गावकर्‍यांना शांत केले आणि मंदिराची डागडुजी केली. सध्या येथे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यकाळात त्यांनी कधी अशा प्रकारचे कृत्य करण्यास सांगितले नाही आणि कुणी केले नाही. सध्या तरुणांच्या मनात असे हिंदुविरोधी विष कोण पेरत आहे, त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर सरकारने कारवाई करणे आवश्यक आहे !