परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७६ व्या जन्मोत्सवाच्या वेळी पानवळ (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील प.पू. दास महाराज आणि पू. (सौ.) लक्ष्मी (माई) नाईक यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

माझ्याकडून अनंतकोटी ब्रह्मांडनायकाला (परात्पर गुरुदेवांना) साष्टांग नमस्कार घातला गेला. या नमस्काराचे वैशिष्ट्य म्हणजे माझा अधू झालेला उजवा पाय काही क्षणांसाठी गुडघ्यातून वाकला.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ५५ व्या पंचमुखी हनुमत्कवच यज्ञाची भावपूर्ण वातावरणात सांगता !

हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी, परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा महामृत्युयोग टळावा आणि त्यांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभावे, तसेच साधकांच्या साधनेतील अडथळे दूर व्हावे, या संकल्पाने आरंभलेल्या ५५ पंचमुखी हनुमत्कवच यज्ञांची येथे सांगता झाली.

प्रभु श्रीरामस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती हनुमंताप्रमाणे दास्यभाव असणारे कलियुगातील आदर्श उदाहरण म्हणजे प.पू. दास महाराज !

‘पानवळ, बांदा (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील प.पू. दास महाराज यांच्या संकल्पानुसार साधकांना होणार्‍या आध्यात्मिक त्रासांच्या निवारणार्थ वर्ष २००२ मध्ये पंचमुखी हनुमत्कवच यज्ञांना आरंभ झाला. प.पू. दास महाराज यांनी ५५ यज्ञांचा संकल्प केला होता. त्यानुसार वर्ष २००२ मध्ये फोंडा (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात…

१०.२.२०१९ या दिवशी श्रीगुरुपादुका-धारण सोहळा बघतांना प.पू. दास महाराज यांना आलेली अनुभूती

‘१०.२.२०१९ या दिवशी वसंत पंचमीच्या महान मुहूर्तावर आम्हा उभयतांना परात्पर गुरुदेवांच्या कृपेमुळे आणि केवळ त्यांच्याच आशीर्वादाने श्रीगुरुपादुका-धारण सोहळा बघायला मिळाला. त्या प्रसंगी श्री. विनायक शानभाग हे श्री गुरुचरण पादुकांचे माहात्म्य निवेदन करत ….

प.पू. दास महाराज आणि प.पू. देवबाबा यांच्या भावस्पर्शी भेटीच्या वेळी त्यांनी परात्पर गुरु पांडे महाराज यांच्याविषयी सांगितलेल्या हृद्य आठवणी

भगवंताने अन् परात्पर गुरु पांडे महाराजांनी आम्हाला प.पू. देवबाबा हे दुसरे संत कार्यासाठी दिले. आपल्या कार्याला हातभार लावणारे परात्पर गुरु पांडे महाराज हे एकमेव संत होते. ते देहरूपाने नाहीत; म्हणून परात्पर गुरुदेवांनी आम्हाला प.पू. देवबाबा दिलेे आहेत.

प.पू. दास महाराज यांना परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या देहत्यागाविषयी मिळालेली पूर्वसूचना आणि त्यांच्या देहत्यागाच्या वेळी अन् देहत्यागानंतर जाणवलेली सूत्रे

परात्पर गुरु पांडे महाराज रहात असलेल्या खोलीतील पावित्र्य मंदिराप्रमाणे जपले पाहिजे !

‘परात्पर गुरु पांडे महाराज हे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे प्रतीरूप आहेत !’ – प.पू. दास महाराज

‘परात्पर गुरु पांडे महाराज बांदा येथील आश्रमात आल्यावर ‘परात्पर गुरु डॉ. आठवले आले आहेत’, असे जाणवणे.

प.पू. दास महाराज यांनी आतापर्यंत झालेल्या ५१ हनुमानकवच यज्ञांविषयी सांगितलेली सूत्रे

‘वर्ष १९५३ मध्ये एकदा मी आणि माझे वडील प.पू. भगवानदास महाराज सज्जनगडावर आमचे गुरु प.प. श्रीधरस्वामी यांच्याकडे गेलो होतो. त्या वेळी प.पू. भगवानदास महाराज यांनी प.प. (परमहंस परिव्रजकाचार्य) श्रीधरस्वामी यांना पंचमुखी हनुमानकवच यज्ञ करण्याविषयी विचारले होते.

रामनाथी आश्रमातील कु. गौरी मुद्गल (वय १९ वर्षे) हिने प.पू. दास महाराज आणि त्यांच्या धर्मपत्नी पू. (सौ.) माई (लक्ष्मी) नाईक यांच्याविषयी काढलेली चित्रे

रामनाथी आश्रमातील ५८ टक्के आध्यात्मिक पातळीची साधिका कु. गौरी मुद्गल हिने प.पू. दास महाराज यांच्या चरणी कृतज्ञताभावे पुढील चित्रे आणि ‘गुरुपादुकांची रचना’ करून सजवलेली खोक्याची लहान पेटी अर्पण केली.

परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या ९१ व्या वाढदिवसाचे वृत्त वाचल्यावर प.पू. दास महाराज यांना ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे स्वतःची ‘जीवनरेखा’ पालटली’, या अनुभूतीचे झालेले स्मरण !

परात्पर गुरुदेवांनी परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या वाढदिवसाचे निमित्त करून मला त्याचे स्मरण घडवले. शब्दसुमनांच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या या किमयेचे स्मरण त्यांच्या चरणी समर्पित करत आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now