पालकांनो, आपली तरुण मुले कुणाच्या संपर्कात येतात आणि कोणत्या दुर्वर्तनाच्या आहारी जातात का, याकडे लक्ष ठेवायला हवे !
मुंबई – येथील वडाळा भागात रहाणार्या तन्मय केणी (वय २७ वर्षे) याने सेक्स रॅकेटच्या प्रकरणात अडकल्याने आत्महत्या केली आहे. पोलिसांनी त्याला सेक्स रॅकेट प्रकरणात चौकशीला बोलावले होते; पण तो घाबरलेला असल्याने पोलीस ठाण्यातून पळून गेला आणि नंतर त्याने आत्महत्या केली. तन्मयचा मित्र सचिन करंजे (वय २५ वर्षे) याने त्याच्या आधारकार्डचा वापर करून मुलींना हॉटेलवर नेत असे आणि त्यांना गुंगीचे औषध देऊन त्यांची छायाचित्रे काढून त्यांना फसवत असे. या प्रकरणी एका मुलीने पोलिसांत तक्रार दिली होती. त्यासंदर्भातील चौकशीच्या वेळी पोलिसांनी तन्मयला बोलावले होते. त्यानंतर वरील प्रकार घडला. पोलिसांनी सचिनला कह्यात घेतले आहे.
आत्महत्येपूर्वी त्याने चिठ्ठी लिहून त्यात ‘मला सचिनने फसवले. त्याच्या जाचाला कंटाळून मी आत्महत्या करत आहे. त्याला फाशी झाली पाहिजे. सॉरी, मम्मी पप्पा !’ असे लिहिले होते. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.