४ लाख ८८ सहस्र रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त !
पुणे – स्वारगेट एस्.टी. स्थानकात प्रवासी महिलांच्या पिशवीतून दागिने चोरणार्या दुर्गा उपाध्याय, लक्ष्मी सकट या दोघींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ४ लाख ८८ सहस्र रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. स्वारगेट एस्.टी. स्थानकात प्रवासी महिलांकडील ऐवज चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. उपाध्याय आणि सकट सध्या खडकीतील म्हाडा कॉम्प्लेक्स परिसरात रहात आहेत. स्वारगेट एस्.टी. स्थानक परिसरात त्यांना गस्त घालणार्या पोलिसांच्या पथकाने संशयास्पद फिरतांना पाहून त्यांना कह्यात घेतले. चौकशीत त्यांनी स्वारगेट एस्.टी. स्थानकात प्रवाशांकडील ऐवज चोरून नेल्याची कबुली दिली. दोघींनी स्वारगेट एस्.टी. स्थानक परिसरात प्रवाशांकडील ऐवज चोरून नेण्याचे ५ गुन्हे केल्याचे अन्वेषणात उघड झाले आहे.
संपादकीय भूमिकाचोरी करण्यामध्ये महिलांनी अग्रेसर होणे हे दुर्दैवी ! अशा महिलांना कठोर शिक्षा होणे आवश्यक ! |