पंढरपूर – नाव न घोषित करण्याच्या अटीवर एका दानशूर भाविकाने ९ लाख २६ सहस्र रुपये मूल्य असलेला सोन्याचा सूर्य कळ्यांचा हार गोफेसह श्री विठ्ठल-रुक्मिणीदेवीच्या चरणी अर्पण केला. हे भाविक श्री विठ्ठल-रुक्मिणीदेवीचे निस्सीम भक्त असून ते श्रीक्षेत्र पंढरपूर येथे आले असता त्यांनी हाराचे दान दिले. या हाराचे वजन १३२ ग्रॅम आहे, अशी माहिती ‘श्री विठ्ठल-रुक्मिणीदेवी मंदिरे समिती’चे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.
या भाविकांनी मंदिर समितीच्या श्री संत तुकाराम भवन येथील अन्नछत्रामध्ये अन्नदानसुद्धा केले. त्याचा सुमारे १ सहस्र ५०० भाविकांनी लाभ घेतला.