जत येथील यल्लमादेवी यात्रेत आमदार गोपीचंद पडळकर यांनी चालू केले विनामूल्य अन्नछत्र !

अन्नछत्र

जत (जिल्हा सांगली), २८ डिसेंबर (वार्ता.) – लाखो भाविकांच्या नवसाला पावणार्‍या श्री यल्लामादेवी यात्रेनिमित्त भाजपचे आमदार श्री. गोपीचंद पडळकर यांनी भाविकांसाठी ३ दिवस विनामूल्य अन्नछत्राचे आयोजन केले आहे. साईकृपा वस्त्रनिकेतन आणि उपाहारगृह धनगरवाडा अथणी रस्त्यासमोर हे अन्नछत्र चालू करण्यात आले आहे. या अन्नछत्राचे उद्घाटन भाविकांच्या हस्ते करण्यात आले. या यात्रेसाठी महाराष्ट्र आणि कर्नाटक येथील भाविक लाखोंच्या संख्येने येतात.