पिंपरी-चिंचवड येथील शिक्षण समिती सभापतींसह नगरसेविकांचे ठिय्या आंदोलन

पालिका आयुक्त सुट्टीवर असल्याने शालेय वस्तू वाटपाला उशीर होत असल्याचा आरोप करत येथील शिक्षण समिती सभापती मनीषा पवार यांच्यासह नगरसेविकांनी ३ फेब्रुवारी या दिवशी स्थायी समितीच्या सभागृहाबाहेर आंदोलन केले.

मंचावर राजकीय गर्दी नको, या महामंडळाच्या भूमिकेच्या विरोधात मी नाही ! – छगन भुजबळ

साहित्य संमेलनाला कोणाला बोलवायचे हा निर्णय अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचा आहे. मंचावर होणार्‍या कार्यक्रमात ढवळाढवळ करणार नाही. मंचावर राजकीय गर्दी नको, या महामंडळाच्या भूमिकेच्या विरोधात मी नाही.

शी जिनपिंग यांना लोकशाही ठाऊक नाही ! – जो बायडेन यांनी फटकारले

एक लोकशाहीप्रधान देशाचे नेतृत्व कसे करायचे याचे गुण जिनपिंग यांच्यात नाहीत, अशा शब्दांत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी जिनपिंग यांना फटकारले.

उत्तराखंडमध्ये जोशी मठाजवळ हिमकडा कोसळल्याने पूरसदृश्य स्थिती : १५० हून अधिक जण बेपत्ता

भारतात आपत्काळाला प्रारंभ झाला आहे आणि तो प्रतिदिन हळूहळू त्याचे रौद्र रूप दाखवत आहे. जोशी मठातील हिमकडा अचानक कोसळून पूरसदृश्य स्थिती निर्माण होणे, हा याच आपत्काळातील एक प्रसंग आहे.

(म्हणे) ‘आम्ही शरजील उस्मानी याच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत !’

हिंदूंना ‘सडलेले’ म्हणणार्‍या आणि बाबरी मशीद पुन्हा बनवण्याचे आव्हान देऊन कायदा अन्सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण करणार्‍या आणि व्यक्तीची पाठराखण करणे, हा एकप्रकारे राष्ट्रद्रोहच नव्हे का ?

चेन्नई येथून अपहरण केलेल्या नौसैनिकाला पालघर येथे जिवंत जाळले

यातील दोषींना सरकारने शोधून काढून तात्काळ फासावर लटकवले पाहिजे, अशी जनतेची मागणी आहे !

मोतिहारी (बिहार) येथे अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या करणारे दोघे अटकेत, तर ५ जण पसार  

आरोपींना साहाय्य केल्याच्या प्रकरणी पोलीस ठाणे अंमलदार निलंबित : अशांना निलंबित नाही, तर बडतर्फ करून कारागृहात डांबून त्यांनाही आरोपींना देण्यात येईल, तशी कठोर शिक्षा केली पाहिजे !

मथुरेतील शाही ईदगाह मशिदीला पूर्णपणे हटवण्याची मागणी करणारी याचिका न्यायालयाने स्वीकारली

हिंदूबहुल भारतात हिंदूंच्या स्वतःच्या न्याय्यहक्कांसाठी एकतर आंदोलन करावे लागते किंवा न्यायालयात जावे लागते, हे संतापजनक आहे ! अशा घटनांवरून हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता लक्षात येते !

हलाल उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केल्यामुळे केरळमध्ये हिंदू ऐक्य वेदीचे सरचिटणीस आर्.व्ही. बाबू यांना अटक

केवळ हिंदुत्वनिष्ठ संघटना अशा प्रकारचे आवाहन करतात म्हणूनच केरळमधील हिंदुद्वेषी साम्यवादी सरकार कारवाई करत आहे, हे लक्षात येते !