एल्गार परिषदेचे आयोजक माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील यांचा पुनरुच्चार
|
पुणे – शरजीलवर धार्मिक भावना दुखावल्यासाठी राजद्रोहाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे; मात्र आम्ही एल्गार परिषदेचे सर्व आयोजक शरजील उस्मानी याच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, असे विधान एल्गार परिषदेचे आयोजक माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील यांनी एका निवेदनाद्वारे केलेे. ‘आजचा हिंदु समाज हा पूर्णतः सडला आहे’, अशी गरळओक शरजील उस्मानी याने पुणे येथील गणेश कला क्रीडा मंच येथे पार पडलेल्या एल्गार परिषदेत केली होती.
We stand with Sharjeel, say Elgaar Parishad organisershttps://t.co/EHX6gEiYp8
— The Indian Express (@IndianExpress) February 7, 2021
कोळसे पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे की, एल्गार परिषदेत शरजील उस्मानी याने केलेले भाषण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप आणि त्यांचा संघ परिवार यांच्याकडून चुकीच्या पद्धतीने दाखवले जात आहे. शरजीलला लक्ष्य करून संघ परिवाराने पुन्हा एकदा त्यांचा धार्मिक विद्वेष आणि जातीयवादी तोंडावळा दाखवून दिला आहे.