ढाका – बांगलादेशात एका मुसलमान मुलीशी त्याचे प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरून तिघा मौलानांनी (मौलाना म्हणजे इस्लामचा अभ्यासक (विद्वान)) एका हिंदु युवकाला बेदम मारहाण करून त्याची हत्या केली.
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, ढाका येथील किशोरगंज जिल्ह्यातील रहिवासी रिडॉय रोबी दास नावाच्या हिंदु युवकाची १७ नोव्हेंबर २०२४ या दिवशी हत्या करण्यात आली. ३ मौलानांनी रिडॉय याचे त्याच्या दुकानातून अपहरण करून त्याला अज्ञात ठिकाणी नेले. तेथे मौलानांनी त्याला बेदम मारहाण केली आणि त्याचा छळ करून हत्या केली. मौलानांनी आरोप केला आहे की, रिडॉयला त्याच्या मुसलमान प्रेयसीचे हिंदु धर्मात धर्मांतर करायचे होते आणि म्हणून त्याला आम्ही ही शिक्षा दिली. या घटनेनंतर रिडॉयच्या कुटुंबियांनी दोषींविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
संपादकीय भूमिकाबांगलादेशातील हिंदूंसह सर्वत्रच्या हिंदूंचे रक्षण करण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे ! |