शी जिनपिंग यांना लोकशाही ठाऊक नाही ! – जो बायडेन यांनी फटकारले

जो बायडेन

वॉशिंग्टन (अमेरिका) – चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग एक कठोर व्यक्तीमत्व आहे. त्यांना लोकशाही ठाऊक नाही. एक लोकशाहीप्रधान देशाचे नेतृत्व कसे करायचे याचे गुण जिनपिंग यांच्यात नाहीत, अशा शब्दांत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी जिनपिंग यांना फटकारले. ते एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. यावर अद्याप चीनकडून कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही.

१. बायडेन पुढे म्हणाले की, मला नाही वाटत की, मी त्यांच्यावर टीका करत आहे. मी जे योग्य आहे, तेच सांगत आहे. शी जिनपिंग यांच्या शरिरामध्ये लोकशाहीचे एक लहान हाडही नाही.

२. जो बायडेन यांनी इराणविषयी म्हटले की, इराणवर अमेरिकेने घातलेले निर्बंध अद्याप हटवण्यात येणार नाहीत. जोपर्यंत इराण अण्वस्त्र करारांतील अटींचे पालन करत नाही, तोपर्यंत हे निर्बंध कायम रहाणार आहेत.