बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटकातील काँग्रेस सरकारने जम्मू येथील वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जाणार्या राज्यातील प्रत्येक यात्रेकरूला ५ सहस्र रुपयांचे आर्थिक साहाय्य देण्याचा निर्णय घेतला आहे. धर्मादाय खात्याचे मंत्री रामलिंगा रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य धार्मिक परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
राज्यातील हिंदूंच्या मंदिरांचे संवर्धन करण्यासह मंदिरांच्या मालमत्तेचे संरक्षण करण्याचा, कोणतेही अतिक्रमण काढून टाकण्याचे आणि त्यांच्या देखभालीसाठी आर्थिक साहाय्य देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मंदिरांमध्ये केलेल्या रोख देणगीचा वापर केवळ त्या मंदिरांसाठीच केला जावा, याची निश्चिती करण्यासाठी एक स्पष्ट घोषणाफलक देखील मंदिरांमध्ये लावला जाणार आहे. काशी आणि गया या तीर्थक्षेत्रांना जाणार्या यात्रेकरूंना कर्नाटक सरकार आधीपासूनच आर्थिक साहाय्य करत आहे.
संपादकीय भूमिकाकाँग्रेसला हिंदूंसाठी खरेच काही करायचे असेल, तर अनेक गोष्टी आहेत; मात्र ‘आम्ही हिंदुविरोधी नाही, आम्हीही हिंदूंना साहाय्य करतो’, हे दाखवण्यासाठी अशा प्रकारची योजना काँग्रेसने आणून हिंदूंना खुश करण्याचा प्रयत्न केला आहे; मात्र हिंदू याला भुलणारे नाहीत, हे काँग्रेसने लक्षात ठेवावे ! |