पिंपरी-चिंचवड येथील शिक्षण समिती सभापतींसह नगरसेविकांचे ठिय्या आंदोलन

आयुक्तांमुळे शालेय वस्तू वाटपाला उशीर होत असल्याचा आरोप

पिंपरी चिंचवड – पालिका आयुक्त सुट्टीवर असल्याने शालेय वस्तू वाटपाला उशीर होत असल्याचा आरोप करत येथील शिक्षण समिती सभापती मनीषा पवार यांच्यासह नगरसेविकांनी ३ फेब्रुवारी या दिवशी स्थायी समितीच्या सभागृहाबाहेर आंदोलन केले. विद्यार्थी उघड्यावर – आयुक्त सुट्टीवर अशा घोषणा या वेळी देण्यात आल्या. दळणवळण बंदी काळात नोकर्‍या गेल्याने शालेय वस्तू खरेदी करण्यासाठी पालकांना आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. ४ फेब्रुवारीपासून प्राथमिक शाळा चालू करण्याचे शासनाचे आदेश असूनही महापालिकेकडून शालेय वस्तूंचे वाटप करण्यास अद्याप आरंभ झाला नाही. त्यामुळे आयुक्तांच्या विरोधात निषेध व्यक्त करण्यात आला.