मारेकरी पसार
यातील दोषींना सरकारने शोधून काढून तात्काळ फासावर लटकवले पाहिजे, अशी जनतेची मागणी आहे !
ठाणे, ७ फेब्रुवारी (वार्ता.) – भारतीय नौदलात कार्यरत असलेले सुरजकुमार मिथिलेश दुबे (वय २७ वर्षे) यांचे १० लाख रुपयांच्या खंडणीसाठी ३१ जानेवारी या दिवशी चेन्नई विमानतळावर ३ अज्ञात व्यक्तींनी अपहरण केले होते.
Navy sailor abducted, burnt alive for Rs 10 lakh ransom in Maharashtra’s Palgharhttps://t.co/AWBn8fx1MA
— Zee News English (@ZeeNewsEnglish) February 7, 2021
त्यांना ३ दिवस चेन्नई येथे अज्ञातस्थळी कोंडून ठेवून त्यांच्याकडे १० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली. त्यांनी ती देण्यास नकार दिल्यानंतर त्यांना चारचाकी गाडीमधून ५ फेब्रुवारीला महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांच्या सीमेलगतच्या तलासरी तालुक्यातील वेवजी गावच्या पश्चिम घाटातील जंगलात आणण्यात आले. तेथे सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास पिस्तुलीचा धाक दाखवून तिघांनी त्यांच्या शरीरावर पेट्रोल ओतून त्यांना पेटवून दिले.
(सौजन्य : IndiaTV)
या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी पोलिसांना दिल्यानंतर घोलवड पोलिसांनी दुबे यांना आगर उपजिल्हा रुग्णालयात भरती केले. त्यानंतर अधिक उपचारांसाठी त्यांना मुंबई येथील रुग्णालयात हालवले. तेथे त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी ३ अज्ञात अपहरणकर्त्यांविरुद्ध घोलवड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील अन्वेषण चालू आहे.