Jaipur Hit & Run Case : जयपूरमध्ये काँग्रेसचे नेते उस्मान खान यांनी गाडीखाली ९ जणांना चिरडले : ३ जणांचा मृत्यू , ६ जण घायाळ !

जयपूरमध्ये काँग्रेसचे नेते उस्मान खान

जयपूर (राजस्थान) – येथे ७ एप्रिलच्या रात्री काँग्रेसचे नेते उस्मान खान यांनी दारूच्या नशेत त्यांची ‘एस्यूव्ही’ चारचाकी गाडी वेगाने चालवत ९ जणांना गाडीखाली चिरडले. या अपघातात एका महिलेसह ३ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ६ जण गंभीररित्या घायाळ झाले आहेत. या घटनेनंतर जयपूर शहर जिल्हा काँग्रेस समितीने उस्मान खान यांना जिल्हा उपाध्यक्षपदावरून तात्काळ हटवले, तसेच त्यांना  पक्षातूनही काढून टाकले आहे.

१. ६२ वर्षीय उस्मान खान गेल्या २० वर्षांपासून व्यवसायासमवेत जयपूर जिल्ह्यातील राजकारणात सक्रीय आहेत. उस्मान खान हे जयपूरमधील विश्वकर्मा औद्योगिक क्षेत्रात एका आस्थापनाचे मालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारीही आहेत.

२. या प्रकरणी जयपूर काँग्रेसचे अध्यक्ष आर्.आर्. तिवारी म्हणाले की, उस्मान खान यांनी गंभीर गुन्हा केला आहे. त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करावी आणि त्यांना कठोर शिक्षा द्यावी.

३. प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गोविंद सिंह दोतासरा यांनी दारूच्या नशेत असे दुष्कृत्य करणार्‍या गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

संपादकीय भूमिका

जनतेच्या जीवावर उठलेले काँग्रेसचे नेते !