हरियाणात ६ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांच्या इतिहासाच्या अभ्यासक्रमात सरस्वती नदीचा समावेश होणार !

हरियाणातील भाजप शासनाचा अभिनंदनीय निर्णय ! सरस्वती नदीचे आणि कुरूक्षेत्राचे आध्यात्मिक महत्त्वही विद्यार्थ्यांना शिकवण्यात यावे, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !

(म्हणे) ‘उत्तरप्रदेशात विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप आणि संघ एखाद्या मोठ्या हिंदु नेत्याची हत्या घडवून आणतील !’

शेतकरी आंदोलनाला केंद्र सरकारने महत्त्व न दिल्याने टिकैत आता निराश झाले आहेत. त्यांचा संयम आता सुटू लागला आहे. त्यामुळेच ते अशा प्रकारचा दावा करू लागले आहेत, हेच यातून लक्षात येते !

ऑलिंपिक स्पर्धेत रौप्यपदक प्राप्त करणारे कुस्तीपटू रविकुमार दाहिया यांच्याकडून भगवान शिवाला जलाभिषेक आणि रुद्राभिषेक !

भारतातील किती हिंदु खेळाडू ईश्‍वराची भक्ती करतात ? किंवा विजय मिळवल्यानंतर ईश्‍वराच्या चरणी लीन होतात ?

मेवात (हरियाणा) जिल्ह्यात मौलानांकडून हिंदु युवकाचे धर्मांतर

या प्रकरणी चौघांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांपैकी अबू बकर याला अटक केली असून इतरांचा शोध घेण्यात येत आहे.

हरियाणा शासनाकडून गोहत्या आणि गोतस्करी रोखण्यासाठी विशेष गोरक्षण कृती दलाची स्थापना

विशेष गोरक्षण कृती दलाची स्थापना करणे हा चांगला निर्णय आहे; मात्र दलाकडून प्रामाणिकपणे कार्यही झाले पाहिजे, याकडे सरकारने लक्ष द्यायला हवे, असेच हिंदूंना वाटते !

‘कृष्णभक्ती’ करण्यासाठी हरियाणातील IPS अधिकारी भारती अरोरा घेणार स्वेच्छा निवृत्ती !

पोलीस अधिकारी अरोरा यांच्याप्रमाणे अन्य पोलीस अधिकार्‍यांनीही कर्तव्य बजावत साधना केल्यास भारतात रामराज्य येण्यास साहाय्य होईल !

केवळ एकच मूल जन्माला घातल्यास हिंदूच हिंदूंची लोकसंख्या न्यून करतील ! – विश्‍व हिंदु परिषद

धर्मांधांच्या वाढत्या हिंदुविरोधी कारवायांमुळे हिंदूंमध्ये भीतीचे वातावरण आहे. यासाठी हिंदूंनी लोकसंख्या वाढवणे, हा त्या समस्येवरील उपाय नूसन हिंदूंना धर्मशिक्षण देऊन त्यांना आध्यात्मिकदृष्ट्या बलसंपन्न करणे, हाच खरा उपाय आहे.

पाकसाठी हेरगिरी करणार्‍या पोलीस शिपायाला अटक

अशा देशद्रोह्यांवर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत, असे राष्ट्रप्रेमींना वाटते !

दळणवळण बंदीत बंद असलेल्या सिरसा (हरियाणा) येथील ‘राईस मिल’ला वीज वितरण विभागाने पाठवले अनुमाने ९० कोटी रुपयांचे वीजदेयक !

सदोष देयके पाठवून ग्राहकांना मनःस्ताप देणार्‍या अधिकार्‍यांवर सरकारने कठोर कारवाई केली पाहिजे !