गुरुग्राम (हरियाणा) येथे सार्वजनिक ठिकाणी नमाजपठण करण्यास पोलिसांची अनुमती !

  • सामाजिक माध्यमांतून टीका

  • विरोध करणार्‍या हिंदूंकडून तडजोड करून नमाजपठणाला अनुमती

  • सार्वजनिक ठिकाणी कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी प्रशासनाची अनुमती घेणे आवश्यक असते. जर प्रत्येक शुक्रवारी नमाजपठणाची अनुमती घेण्यात आली असेल, तर हिंदूंनीही उद्या प्रत्येक दिवशी विविध देवतांची पूजा आणि स्तोत्रपठण करण्याची अनुमती मागितली, तर चुकीचे ठरू नये ! – संपादक
  • ‘काही मुसलमान प्रथम सार्वजनिक ठिकाणी नमाजपठण चालू करतात आणि हळूहळू त्या जागेवर नियंत्रण मिळवून तेथे अवैध मशीद किंवा दर्गा बांधतात’, असा अनुभव देशात सर्वत्र आहे. तरीही अशा प्रकारची अनमुती दिली जाणे, हे भाजप सरकारच्या राज्यात अपेक्षित नाही, असेच हिंदूंना वाटते ! – संपादक
  • कोरोनाचे कारण पुढे करून हिंदूंना श्रीगणेशचतुर्थी, कावड यात्रा, श्रीकृष्णजन्माष्टमी, दसरा, दिवाळी आदी सण साजरे करण्यावर निर्बंध घालणार्‍या सरकारी यंत्रणा मुसलमानांना मात्र सार्वजनिक ठिकाणी नमाजपठणासाठी अनुमती देतात, हे लक्षात घ्या ! – संपादक

गुरुग्राम (हरियाणा) – येथे काही दिवसांपूर्वी सार्वजनिक ठिकाणी नमाजपठण करण्यात येत होते. त्यास हिंदूंकडून विरोध केल्यावर हिंदू आणि मुसलमान यांच्यात तडजोड होऊन नमाजपठण करण्यास अनुमती देण्यात आली. याविषयी गुरुग्राम पोलिसांनी ट्वीट करून म्हटले की, सार्वजनिक ठिकाणी नमाजपठणाविषयी हिंदु आणि मुसलमान यांच्यात चर्चा होऊन नमाजपठण करण्याची अनुमती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. धार्मिक सद्भाव आणि शांतता राखणे आपले दायित्व आहे. (हिंदूबहुल देशात अल्पसंख्यांच्या कृतींमुळे तणावग्रस्त झालेले वातावरण शांत आणि सौहार्दपूर्ण करण्यासाठी नेहमी हिंदूंनाच माघार घ्यावी लागते, हे लक्षात घ्या ! – संपादक)

पोलिसांच्या या ट्वीटवर सामाजिक माध्यमांतून टीका होत आहे. ‘पोलीस लोकांचा विरोध असतांना सार्वजनिक ठिकाणी नमाजपठण करण्याला योग्य कसे ठरवू शकतात ?’ असा प्रश्‍न विचारण्यात येत आहे. काही जणांनी म्हटले आहे की, मशिदीमध्ये नमाजपठण होऊ शकत नाही का ? तडजोड करून सार्वजनिक ठिकाणावर अतिक्रमण करणे योग्य आहे का ? जर प्रशासन अशा प्रकारची अनुमती देत असेल, तर उद्या हनुमान चालीसा आणि पूजा करणेसुद्धा चालू केले पाहिजे. इस्लामी देशांमध्ये सार्वजनिक ठिकाणी नमाजपठण करण्याची कृती अयोग्य मानली जाते. यासह ‘ज्या हिंदूंनी तडजोड केली, त्यांनी अन्य हिंदूंशी चर्चा केली होती का ?’, असे अनेक प्रश्‍न उपस्थित करण्यात येत आहेत.