हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त  श्री गणेशपूजाविधीविषयी ‘ऑनलाईन’ प्रवचन

फरिदाबाद (हरियाणा) – गणेशोत्सवानिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथे एका ‘ऑनलाईन’ प्रवचनाचे नुकतेच आयोजन करण्यात आले. या वेळी समितीच्या सौ. संदीप कौर मुंजाल यांनी गणपतीविषयी शास्त्रीय माहिती सांगितली. सौ. मुंजाल यांनी मूर्तीविज्ञान, श्री गणेशपूजाविधी, मूर्तीविसर्जन यांविषयी विस्तृत माहिती सांगितली. या वेळी जिज्ञासूंनी श्री गणेशाचा सामूहिक नामजप केला.