गुरुग्राम (हरियाणा) येथे मोकळ्या जागेत अवैधरित्या नमाजपठण करणार्‍यांच्या विरोधात हिंदु महिलांचे आंदोलन !

  • हिंदूंनीच नमाजपठण करण्यास अनुमती दिल्याचे सांगणार्‍या पोलिसांचा खोटारडेपणा उघड ! – संपादक
  • हरियाणामध्ये भाजपचे सरकार असतांना तेथे अशा प्रकारे मोकळ्या जागेवर अवैधरित्या नमाजपठण होणे आणि ते रोखण्यासाठी हिंदु महिलांना आंदोलन करावे लागणे, हे हिंदूंना अपेक्षित नाही ! – संपादक
  • धर्मांधांवर कारवाई करावी लागू नये, यासाठी ‘हिंदूंनी नमाजपठणाची अनुमती दिली’, असे खोटे सांगणार्‍या पोलिसांवर कारवाई करणे आवश्यक ! – संपादक
  • धर्मांधांच्या विरोधात हिंदु महिला रस्त्यावर उतरतात, यातून जन्महिंदूंनी बोध घ्यावा ! – संपादक
हिंदु महिलांचे आंदोलन

गुरुग्राम (हरियाणा) – येथील ‘सेक्टर ४७’ येथे वास्तव्य करणार्‍या हिंदु महिलांनी मोकळ्या जागेत अवैधरित्या चालू असलेल्या नमाजपठणाला विरोध करण्यासाठी भजन-कीर्तन आणि आरती केली. ८ ऑक्टोबर या दिवशी हिंदु महिलांनी अवैधरित्या चालू असलेल्या नमाजपठणाच्या निषेधार्थ हातात फलक पकडून निदर्शने केली. याच वेळी पोलिसांच्या कडक सुरक्षेत नमाजपठणही करण्यात आले. (अवैध गोष्टी करणार्‍या धर्मांधांना सुरक्षा देऊन समाजात शांतता बिघडवणारे पोलीस भारताचे कि पाकचे ? अधिकाराचा दुरुपयोग करणार्‍या अशा पोलिसांना कारागृहात डांबा ! – संपादक) ‘एखादी भूमी मोकळी असली, त्यावर बांधकाम झालेले नसले, याचा अर्थ एखाद्या समाजाने ती कह्यात घ्यावी, असा होत नाही’, असे एका आंदोलक महिलेने या वेळी म्हटले.

येथील नगरसेवक कुलदीप यादव म्हणाले, ‘‘या ठिकाणी नमाजपठण करण्याची अनुमती नाही. त्यामुळे याला स्थानिक लोक विरोध करत आहेत. येथून काही किलोमीटर अंतरावरच मशीद आहे. तेथे त्यांना जाता येईल. मग सार्वजनिक ठिकाणी नमाजपठण करून त्यांना काय कह्यात घ्यायचे आहे ?’’ एक महिला आंदोलक म्हणाली, ‘‘जोपर्यंत प्रत्येक शुक्रवारी येथील उघड्यावर नमाजपठण बंद होत नाही, तोपर्यंत आम्ही भजन-कीर्तन चालूच ठेवणार आहोत.’’

मुसलमानधार्जिण्या पोलिसांचा खोटारडेपणा उघड !

मागील मासामध्ये येथे नमाजपठणासाठी जमलेल्या धर्मांधांच्या जमावाला स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध केला होता. त्यानंतर गुरुग्राम पोलिसांनी दावा केला की, स्थानिक हिंदु नागरिक आणि मुसलमान यांच्यात चर्चा झाली आहे. त्यांच्यात तडजोड झाली असून सार्वजनिक ठिकाणी चालू असलेल्या नमाजपठणाला हिंदूंनी अनुमती दिली आहे. या आशयाचे ट्वीटही पोलिसांनी त्यांच्या ट्विटर खात्यावर केले होते. त्यानंतर हिंदूंनी वैध मार्गाने यास विरोध करणे चालूच ठेवले. पोलिसांचा खोटेपणा उघड करण्यासाठी अधिवक्ता अभिषेक शर्मा यांनी ‘जिल्ह्यातील अशा जागा ज्या २ समाजांमध्ये तडजोड होऊन नमाजपठण करण्यासाठी खुल्या करण्यात आल्या’, अशांची माहिती माहितीच्या अधिकाराखाली मागवली. हिंदूंमध्ये जागृती होऊन स्वतःचा खोटेपणा उघड झाल्याचे लक्षात आल्यावर पोलिसांनी संबंधित ट्वीट ‘डिलीट’ केले (पुसून टाकले).