गुरुग्राम (हरियाणा) येथे सार्वजनिक ठिकाणी नमाजाला विरोध करणारे ३० हिंदू पोलिसांच्या कह्यात !

पोलिसांनी ३७ सार्वजनिक ठिकाणी नमाजपठणाला दिली आहे अनुमती !

  • वास्तविक सार्वजनिक ठिकाणी नमाजपठण करण्याची अनुमती पोलिसांनी दिलीच कशी ? यामुळे नागरिकांना होणार्‍या त्रासाचे काय ? बेकायदेशीर कृत्यांची पाठराखण करणारे असे पोलीस कायदा आणि सुव्यवस्था काय राखणार ? – संपादक
  • हरियाणामध्ये भाजपचे सरकार असतांना अशा प्रकारचा हिंदूंना विरोध का करावा लागत आहे ? – संपादक
सार्वजनिक ठिकाणी नमाजाला विरोध करताना गुरुग्राम येथील हिंदू

गुरुग्राम (हरियाणा) – येथे पोलिसांकडून प्रत्येक शुक्रवारच्या नमाजपठणासाठी एकूण ३७ सार्वजनिक ठिकाणी अनुमती देण्यात आली आहे. हिंदूंच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून या नमाजपठणाला विरोध करण्यात येत आहे. शुक्रवार, २९ ऑक्टोबर या दिवशी विरोधामुळे परिसरात तणाव निर्माण झाला. नमाजाच्या वेळी हिंदू संघटनेचे कार्यकर्ते नमाजाच्या ठिकाणी उपस्थित झाले आणि घोषणाबाजी करू लागले. यामुळे तणाव निर्माण झाल्याने पोलिसांनी ३० जणांना कह्यात घेतले. जवळपास गेल्या ५ आठवड्यांपासून हा प्रकार चालू आहे. काही दिवसांपूर्वी ‘हिंदूंनी नमाजपठणासाठी अनुमती दिली; म्हणून आम्ही सार्वजनिक ठिकाणी नमाजपठण करण्यास देत आहोत’, असे पोलिसांनी म्हटले होते. या वक्तव्याला हिंदूंनी विरोध केल्यानंतर पोलिसांनी अशा आशयाचे ट्वीट मागे घेतले होते.