हिंदु जनजागृती समिती आणि धर्माभिमानी हिंदू यांच्या संघटित विरोधाचा परिणाम
हिंदूंनो, या यशाविषयी भगवंताच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करा ! हिंदु धर्माच्या होत असलेल्या अनादराच्या प्रत्येक प्रकरणाच्या विरोधात वैध मार्गाने आंदोलन करणे, हे आपले धर्मकर्तव्य असून ते बजावल्यास आपली साधनाही होणार आहे, हे लक्षात घ्या ! – संपादक

वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक
गुरुग्राम (हरियाणा) – येथील ‘सॅटो टॉयलेट्स एशिया’ (SATO Toilets Asia) नावाचे आस्थापन सॅनिटरी वस्तूंचे (आरोग्य चांगले राखण्यासंबंधीच्या वस्तूंचे) उत्पादन करून त्यांची विक्री करते. यांमध्ये साबण, सॅनिटायझर, हँड वॉश आदींचा समावेश आहे. याचा प्रसार करण्यासाठी या आस्थापनाने एक विज्ञापन बनवून ते ट्विटरवर पोस्ट केले होते. या विज्ञापनामध्ये श्री दुर्गादेवी दाखवण्यात आली होती. यामध्ये तिच्या हातांमध्ये साबण, सॅनिटायझर आदी वस्तू दाखवण्यात आल्या होत्या. ‘श्री दुर्गादेवी शस्त्रांद्वारे दुष्टांचा नाश करते, तसेच या उत्पादनांद्वारे किटाणूंचा नाश करते’, असा संदेश या विज्ञापनातून देण्यात आला होता.
या विज्ञापनाची माहिती हिंदुत्वनिष्ठांना मिळाल्यावर त्यांनी हिंदु जनजागृती समितीला याविषयी सांगितले. समितीने सामाजिक माध्यमांद्वारे याविषयी जागृती करणारी पोस्ट प्रसारित करत या विज्ञापनाचा वैध मार्गाने विरोध करण्याचे आवाहन केले. धर्माभिमानी हिंदूंनी केलेल्या संघटित विरोधानंतर काही घंट्यांतच या आस्थापनाने विज्ञापन हटवले.
राज्यपालांची ‘छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालया’ला भेट !
संपादकीय : ‘इस्रो’पुढील आव्हाने !
Pune Love-Jihad : हिंदु तरुणीला प्रेमजाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत सुफियान खान याच्याकडून मानसिक छळ !
HJS Demand : कुणाल कामरा आणि प्रकाश राज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवा !
Warship ‘Malvan’ : भारतीय नौदलाकडून ‘मालवण’ युद्धनौकेच्या ‘वाघ नख’ दर्शवलेल्या नवीन बोधचिन्हाचे अनावरण
Hospital Gives Wrong Blood : राजस्थानमधील रुग्णालयात बाळंतीण महिलेला ‘ओ-पॉझिटिव्ह’ ऐवजी ‘चुकून ‘बी-पॉझिटिव्ह’ रक्त दिले : प्रकृती चिंताजनक !