हे पोलिसांना लज्जास्पद !

वर्ष २०१२ मध्ये मुंबईच्या आझाद मैदानात दंगल घडवणाऱ्या रझा अकादमीच्या ‘इफ्तार पार्टी’ला मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे उपस्थित राहिले. या दंगलीच्या वेळी जिहाद्यांकडून महिला पोलिसांचा विनयभंग करण्यात आला होता.

पुण्यात अल्पवयीन विद्यार्थ्याकडून शिक्षिकेचा विनयभंग; प्रसाधनगृहात भ्रमणभाषद्वारे चित्रीकरण !

विद्यार्थ्यांनी शिक्षिकेचा विनयभंग करण्यासारखी दुसरी लाजीरवाणी गोष्ट नाही. ढासळलेल्या समाजातीची नीतीमत्ता उंचावण्यासाठी शाळेतूनच धर्मशिक्षण द्यायला हवे.

पुणे येथे धावत्या बसमध्ये अल्पवयीन मुलीसमवेत वाहकाचे अश्लील कृत्य !

असुरक्षित पुणे ! धावत्या बसमध्ये अल्पवयीन मुलीसमवेत अश्लील कृत्य करण्याचे धाडस करणाऱ्या वाहकांना कठोर शिक्षा होणे अपेक्षित आहे !

पाकिस्तानमध्ये चर्चच्या क्रॉसची धर्मांधांकडून तोडफोड

महंमद बिलाल या तरुणाने येथील चर्चच्या क्रॉसवर चढून ‘अल्ला हू अकबर’ अशा घोषणा दिल्या. त्याच्यासमवेत आणखी २ जण होते. या वेळी त्यांनी ख्रिस्ती तरुणींकडे पाहून अश्लील हातवारेही केले.

महाबळेश्वर (जिल्हा सातारा) पोलिसांनी दिले महिलांना स्वरक्षणाचे धडे !

‘महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्प’ : महिलांवरील, बालकांवरील लैंगिक अत्याचार, ॲसिड फेक, कौटुंबिक हिंसाचार, मानवी व्यापारात बळी पडलेल्या महिला आणि बालके यांना आर्थिक साहाय्य व्हावे यांसाठी हा उपक्रम राबविण्यात आला.

मुंबईत विनयभंगाच्या गुन्ह्यातील क्रीडा शिक्षकाची निर्दोष सुटका !

आरोपीने वाईट हेतूने पीडितेला स्पर्श केल्याचे ठोस पुरावे न्यायालयात जोपर्यंत सादर केले जात नाहीत, तोपर्यंत संबंधित स्पर्शाला असभ्य भावनेने केलेला हल्ला म्हणता येणार नाही किंवा तिच्या विनयशीलतेचा अपमान झाला असेही म्हटले जाऊ शकत नाही.

संभाजीनगर येथे मुलींची छेड काढण्यास मज्जाव केल्याने धर्मांधाकडून मुख्याध्यापक आणि अधीक्षक यांच्यावर तलवारीने आक्रमण !

‘चोर तो चोर वर शिरजोर’, या वृत्तीचे धर्मांध ! सरकारने अशांच्या मुसक्या आवळून त्यांना आजन्म कारागृहात टाकले पाहिजे !

ख्रिस्ती नववर्षाच्या स्वागताच्या नावाखाली धार्मिक, ऐतिहासिक आणि सार्वजनिक ठिकाणी होणारे अपप्रकार रोखा !

हिंदु जनजागृती समितीची सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोलीस आणि प्रशासन यांच्याकडे मागणी : अशी मागणी का करावी लागते ? असे अपप्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने स्वतःहून कृती करणे अपेक्षित आहे !

संभाजीनगर येथे महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी धर्मांधाला अटक !

स्वतःला अल्पसंख्यांक म्हणवणारे गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य ! अशा घटनांविषयी पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी किंवा इस्लामी संघटना तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !

चंद्रपूर येथे शिक्षिकेच्या विनयभंगाप्रकरणी बीआयटी अभियांत्रिकीच्या २ प्राचार्यांच्या विरोधात गुन्हा नोंद !

प्राचार्यांनी शिक्षिकेचा विनयभंग करणे म्हणजे शिक्षण क्षेत्राला काळीमा फासण्यासारखेच होय ! अशा वासनांधांना बडतर्फच करायला हवे !