असुरक्षित पुणे ! धावत्या बसमध्ये अल्पवयीन मुलीसमवेत अश्लील कृत्य करण्याचे धाडस करणाऱ्या वाहकांना कठोर शिक्षा होणे अपेक्षित आहे ! – संपादक
पुणे – येथील पी.एम्.पी.एल्. बसमधून प्रवास करणाऱ्या अल्पवयीन मुलीसमवेत ३० वर्षीय प्रशांत गोडवे या बसवाहकाने अश्लील कृत्य केल्याची घटना घडली आहे. पीडित मुलगी बसमधून प्रवास करत असतांना आरोपीने तिच्याजवळ उभे राहून तिच्याशी अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला, पीडितेने खडसावल्यानंतर त्याने पीडितेच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. हा सर्व प्रकार धावत्या बसमध्ये घडला. या प्रकरणी पीडित मुलीने बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली असून पोलिसांनी आरोपी प्रशांत गोडवे याला अटक केली आहे. बंडगार्डन पोलीस आरोपीची कसून चौकशी करत आहेत.